*एप्रिलमध्ये अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रंगणार धमाकेदार एंटरटेनमेंटचा जल्लोष!*
*मुंबई ३ एप्रिल २०२५ :* एप्रिल महिन्यात उन्हाच्या तापमानासोबत तुमच्या मनोरंजनाचा पारा सुद्धा चढवूया अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुपरहिट मराठी सिनेमे, दमदार वेब सिरीज आणि मराठी डब साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट घरबसल्या पाहूया. आणि एप्रिल फूलमध्ये तुम्हाला इतर लोकं फसवतील पण आम्ही मात्र तुम्हाला १००% झकास मनोरंजनाची गॅरंटी देऊ. चला तर एप्रिल महिन्यात डबल एंटरटेनमेंटची मज्जा घेऊ आणि खूप एन्जॉय करू.
लॉक्ड - बंद वाड्यातील रहस्यमय 'सापळा' [4th April]
‘लॉक्ड’ हि एक तेलुगू क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रदीप देवा कुमार यांनी केले आहे. हि सिरीज ०४ एप्रिल २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. हि एक रहस्यमय कहाणी आहे ज्यात एक असा रहस्यमय व्यक्ती आहे, जो आपली ओळख लपवून ठेवतो. सर्वजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण कुठलाही मार्ग सापडत नाही. जसजसे दिवस जातात, तसतशी परिस्थिती आणखी बिकट होत जाते. पण अचानक, त्यांच्यातील एक मास्टरमाइंड पुढे येतो आणि सगळा खेळ बदलतो.
आम्ही बटरफ्लाय : चार मित्रांच्या स्वप्नांचा अनोखा प्रवास | गरुडान : न्यायाच्या जाळ्यात अडकलेलं 'सत्य' [11th April]
'आम्ही बटरफ्लाय' हा चित्रपट चार जिवलग मित्रांच्या नात्यावर आधारित आहे. अनिकेत लिमजे आणि श्रीकुमार शिरस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. शिवा, रणजी, शाहरुख आणि रामन या १२ वर्षांपासून सोबत असलेल्या मित्रांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी आहे.
त्याचबरोबर, 'गरुडान' हा मल्याळम भाषेतील ब्लॉकबस्टर ॲक्शन-ड्रामा देखील आता मराठीत उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट प्रामाणिक पोलीस हरीश माधव आणि प्राध्यापक निशांत यांच्या आयुष्याभोवती फिरतो. अनपेक्षितपणे एका गुन्ह्यात अडकलेल्या या दोघांपैकी हरीशला आपली निष्ठावान प्रतिमा जपायची असते, तर निशांतला न्याय मिळवायचा असतो. हे दोन्ही सुपरहिट चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या भेटीला येत आहेत.
आश्रय : त्याग आणि मातृत्वाची कहाणी [18th April]
'आश्रय' हा मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये एका दत्तक घेतलेल्या मुलीची हृदयस्पर्शी कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'संतोष कापसे' यांनी केले असून या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १८ एप्रिल २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. हि कहाणी आहे तिची जी कचऱ्यात टाकलेल्या लहान बाळाला दत्तक घेते, मातृत्वाचे प्रेम देते आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले जीवन धोक्यात घालते.
कोडाई डायरीज - एक भयाण सत्य : रहस्य, अपहरण आणि पोलीसांचा संघर्ष [25th April] 'इराई’ हि एक तमिळ भाषेतील क्राईम वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन राजेश एम. सेल्वा यांनी कुमार यांनी केले असून हि सिरीज २५ एप्रिल २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याचं अपहरण आणि त्यातच शहरातल्या श्रीमंत घरातील पुरुष अचानक गायब होत आहेत. या दोन्ही गोष्टींचा तपास करण्यासाठी म्हणून रॉबर्ट वासुदेवन नावाच्या एका हुशार पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक झालेली असते. आता प्रश्न असा आहे, की तो या गुन्ह्यांचा छडा लावू शकेल का?
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "प्रेक्षकांसाठी नेहमी काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच एप्रिल महिन्यात, थरारक रहस्ये, हृदयस्पर्शी कथा आणि दमदार ॲक्शनने भरलेले चित्रपट आणि वेब सिरीज तुमच्या भेटीला येणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सिरीज केवळ मनोरंजन देणाऱ्या नाहीत, तर त्यातून एक प्रेरणादायक संदेशही मिळेल. कारण अल्ट्रा झकास मराठी म्हणजे तुमच्या उत्तम मनोरंजनाची १०० % हमी आहे."