*सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट! सरकार-सानिकासमोर नवे आव्हान*
पहा #लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई १ एप्रिल, २०२५ :* कलर्स मराठीवरील #लय आवडतेस तू मला सरकार आणि सानिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला असून, या सोहळ्याने दोन्ही गावांमधील वैर संपुष्टात आले आहे. साहेब रावांनीही आता सानिकाला पूर्णपणे स्वीकारले असून, सरकारलाही जावयाच्या नात्याने मान्यता दिली आहे.
सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच, नव्या आयुष्याच्या या प्रवासात काही अनपेक्षित घटना घडू लागतात. सरकारने सानिकासाठी खास हनीमून ट्रिपची आखणी केली आहे, त्यामुळे दोघे एकत्र नवीन सुरुवात करत आहेत. दुसरीकडे, कुटुंबाला एका अनोळखी स्त्रीकडून धक्कादायक इशारा मिळतो, ज्यामुळे सगळे चिंतेत पडतात. परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत जाते, आणि कुटुंबातील एका व्यक्तीला एक कठीण व्रत करावे लागते. मात्र, या धार्मिक विधीसोबतच काही अघोरी घटना घडतात, ज्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
सरकार-सानिका अनपेक्षित संकटाच्या भोवऱ्यात सापडतात आणि एक नवा संघर्ष सुरू होतो. आता पुढे काय घडणार? हा नवा डाव कोणाचा आहे? आणि सरकार-सानिका यातून सुखरूप बाहेर पडतील का? सरकार - सानिका या संकंटाला कसे सामोरे जाणार? हे जाणून घेण्यासाठी बघा #लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.