Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' च्या मंचावर कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे

 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'  च्या  मंचावर कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे



लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे... आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व...! नव्या उमद्या कलाकारांना कायमच प्रोत्साहन देणारे प्रवीण तरडे यांच्यामुळे सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'चा मंच गाजणार आहे आणि कीर्तन जोरदार रंगणार आहे. येत्या शनिवारी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून प्रवीण तरडे उपस्थित राहून कीर्तनकारांना प्रोत्साहन देणार आहेत. या वेळी उपस्थित कीर्तनकारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देताना महाराष्ट्राचा डीएनए हा कीर्तनाचा आहे,  असं प्रतिपादन त्यांनी केलं.


‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर ।  परी नामाचा गजर सोडू नको रे ।।'



असं सांगत सहभागी कीर्तनकारांचं कौतुक त्यांनी केलं. हे सादरीकरण मला थक्क करणारं असून मराठी मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी मनाशी थेट जोडणारा हा रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठी वाहिनीनं आणल्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी असल्याचंही प्रवीण तरडे म्हणाले.  


'आजवर अनेक पुरस्कार मला मिळाले पण या मंचावर उपस्थित राहण्याची संधी सोनी मराठी वाहिनीनं मला दिली हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारानं माझे आईवडीलही नक्कीच सुखावले असणार. आज आपल्याला समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे. या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे याचा आनंद आहे. हा  रिअ‍ॅलिटी शो प्रत्येकाचा लाडका होणार आहे. हा शो अखंड चालू राहायला हवा', त्याची अनेक पर्वं व्हायला हवीत,  अशा शुभेच्छा त्यांनी या प्रसंगी दिल्या. 



'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार...' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.


Download Link - https://we.tl/t-9Zx4pj2Wv2

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.