*कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’मध्ये सुरू होतोय ‘आईराजा’ अध्याय – देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ!*
पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९.०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
*मुंबई, १३ मार्च २०२५:* प्रत्येक देवी भक्तासाठी विशेष ठरणारा ‘आईराजा’ अध्याय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू होतो आहे. देवी पार्वतीचा अवतार असलेल्या आई तुळजाभवानीचे यमुनांचल पर्वतरांगांतील वास्तव्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तिचे निर्माण झालेले अढळस्थान या कथानकाचा कळस म्हणजे तुळजापुरातील ‘आईराजा’ अधिष्ठानाची स्थापना. पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९.०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
या भव्य अध्यायात देवीचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सर्व देव, ऋषि-मुनी, गुरु महादेव आणि सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने देवीने राज्याभिषेकाला मान्यता दिली असून, हा ऐतिहासिक सोहळा मालिकेत उत्कंठा वाढवणार आहे.
याच पार्श्वभूमीवर, देवीने गावकऱ्यांसोबत साजरा केलेला होळी उत्सव खास आकर्षण ठरणार आहे. गावकऱ्यांनी देवीला अर्पण केलेला पुरणाचा नैवेद्य, तिचे त्यांच्यासोबत केलेले सहभोजन या भागांमध्ये भावनिक आणि भक्तीमय वातावरण निर्माण करणार आहे.
पण दुसरीकडे असुरकुळात होळीच्या निमित्ताने दितीचा आक्रोश टिपेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, दीतीची मुलगी होलिका हिच्याशी संबंधित एक आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ही भव्य पर्वणी चुकवू नका! सोम ते शनि, रात्री ९.०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!