रंगभूमीवर येतंय 'कुटुंब किर्रतन'...
'प्रशांत दामले फॅन फाउंडेशन' प्रकाशित व 'गौरी थिएटर्स' निर्मित 'कुटुंब किर्रतन' हे बहुचर्चित नवीन नाटक २१ मार्च रोजी रंगभूमीवर येत आहे. संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत. या नाटकाचे कथासूत्र विनोद रत्ना यांचे असून, नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडे याने केले आहे. अमेय दक्षिणदास हे या नाटकाचे दिग्दर्शक असून, अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य व किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.