*पिंगा गर्ल्सच्या साथीने जपला जाणार प्रेरणाचा स्वाभिमान !*
पिंगा गं पोरी पिंगा १६ मार्च रोजी दुपारी १ आणि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर
*मुंबई १३ मार्च, २०२५ :* कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत वल्लरीसमोर समीरचं खरं रूपं येताच वल्लरीने प्रेरणाला मोलाचा सल्ला दिला होता. इतकेच नसून वल्लरीने प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द्व आवाज उठवण्यास प्रवृत्त देखील केले. पण आपल्या आई - वडिलांचा विचार करता प्रेरणा कुठल्याही ठाम निर्णया पर्यंत पोहचू शकली नाही.
मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा आहे कि, प्रेरणा समीरला सांगू शकेल का ? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का ? महारविवारच्या भागात प्रेरणाचे वडील समीरला जाब विचारताना दिसणार आहे. त्यावर पुन्हाएकदा समीरच्या स्वभावानुसार तो सगळ्यांच्या समोर प्रेरणावर हात उगारताना दिसणार आहे. तेव्हा मात्र वल्लरीचा राग अनावर होता आणि ती समीरला थांबवते आणि असं केल्यास परिणाम वाईट होतील असं देखील दटावते. आता महारविवरच्या भागात पुढे काय होणार ? प्रेरणा समीरशी लग्न करणार का ? काय असेल प्रेरणाचा निर्णय ? जाणून घेण्यासाठी बघा पिंगा गं पोरी पिंगा मालिकेचा महारविवारचा विशेष भाग १६ मार्च रोजी दुपारी १ आणि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचं आहे आणि याची जाणीव वल्लरीने प्रेरणाला करून दिली. महारविवारच्या भागात सगळ्यांसमोर समीरचे खरे रूप आल्यावर मालिकेत कुठला ट्विस्ट येणार ? पिंगा गर्ल्सच्या साथीने प्रेरणाचा स्वाभिमान कसा जपला जाणार ? हे नक्की बघा.