सोनम कपूर , ऑस्कर नामांकित अभिनेत्री रोज़मंड पाइक आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग किनवेनसह डिओरच्या नवीन डी-जर्नी बॅगच्या अनावरणासाठी अनोख्या फ़िल्म पैरोडीमध्ये सामील
फ्रेंच लक्झरी ब्रँड डिओर ने गेल्या वर्षीच्या शेवटी सोनम कपूरला आपला ब्रँड अॅम्बेसेडर घोषित केले होते. आता त्या ऑस्कर नामांकित अभिनेत्री रोज़मंड पाइक, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग किनवेन, आणि डिओर हाऊस अॅम्बेसेडर्स - कॅमिली कॉटिन आणि देवा कॅसल सोबत डिओरच्या नवीन डी-जर्नी बॅगच्या लॉन्चसाठी तयार केलेल्या अनोख्या फिल्म पैरोडीमध्ये दिसत आहे.
या विनोदी वीडियोत ब्रिटिश अभिनेत्री रोज़मंड पाइक एक इंफोमेरशियलच्या धर्तीवर डिओरची प्रवक्त्या म्हणून दिसतात आणि या नवीन ‘मस्ट-हॅव’ बॅगच्या खास वैशिष्ट्यांचे वर्णन करतात. हा बॅग ग्लॅमर आणि स्वातंत्र्याचा अनोखा संगम आहे
परफेक्ट बॅग शोधणे खरोखरच एक मोठे आव्हान असू शकते!"
या वाक्यासह या चित्रपटाची सुरुवात होते. डिओर हाऊसने डी-जर्नी बॅगच्या लॉन्चसाठी हा पैरोडी चित्रपट तयार केला आहे. हा बॅग मारिया ग्राझिया क्युर्री यांनी डिझाइन केला आहे आणि डिओर स्प्रिंग-समर 2025 रेडी-टू-वियर कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे.
या चित्रपट पैरोडीमध्ये, बॉलीवूड सुपरस्टार आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूर एडिटर-इन-चीफ च्या भूमिकेत दिसतात, तर ऑलिम्पिक टेनिस चॅम्पियन झेंग किनवेन थेट कोर्टवरून येतात.
याशिवाय, कॅमिली कॉटिन आणि देवा कॅसल रिहर्सल किंवा ध्यानसाधनेत मग्न दिसतात, आणि मॉडेल अनियर अनेई फिटिंग सेशनमध्ये आहे.
हे सर्व आपल्या अनोख्या शैलीत डी-जर्नी बॅगच्या असीम बहुपर्यायी उपयोगांबद्दल आणि त्याच्या अद्वितीय सोयीसुविधांबद्दल कौतुक करताना दिसतात.
व्हिडिओ येथे पहा:
https://youtu.be/PK6pCcxbYhU?si=37b5C13LMFInvgXv](https://youtu.be/PK6pCcxbYhU?si=37b5C13LMFInvgXv)