Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*गणपती बाप्पा आणि खंडोबाच्या चरणी माथा टेकून सूरज चव्हाण ने केली चित्रपट _*झापुक झुपूक*_*च्या प्रमोशनला जोरदार सुरुवात!*

 *गणपती बाप्पा आणि खंडोबाच्या चरणी माथा टेकून सूरज चव्हाण ने केली चित्रपट _*झापुक झुपूक*_*च्या  प्रमोशनला जोरदार सुरुवात!*



बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या चित्रपटाच्या  प्रमोशन ला आज मुहूर्त लागलाय. मोरगावच्या गणपती बाप्पाचा आणि जेजुरीच्या खंडोबा देवाचा आशीर्वाद घेत सुरज चव्हाण ने _झापून झुपक_ सिनेमाच्या प्रमोशन ची सुरुवात केली आहे.  खंडोबा देवाच्या चरणी आज सूरज ने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर ठेवून, बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. इतकच नव्हे तर जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची आज एक छोटीशी झलक ही त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे.



Link - https://youtu.be/h9Ct81dbh5M


सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात  अनेक मराठी  कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 


हालाकीच्या परिस्थितीतून वर येत सुरज ने  स्वतःच वेगळं असं छान विश्व तयार केलं. त्यामुळे सुरज चे चाहते  त्याच्या ह्या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहेत. 



जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित,  निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित _*झापुक झुपूक*_ चित्रपट कौटुंबीक आणि मनोरंजन ने भरपूर अशी एक धमाल लव्हस्टोरी आहे.  सिनेमाची कथा नक्की  काय आणि कशी  असणार आहे याचा उलगडा २५ एप्रिल ला सिनेमागृहातचं जाऊन बघूया.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.