Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५ सोहळा !!!*

*मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५ सोहळा !!!*



*झी नाट्य गौरव पुरस्काराचं धमाकेदार २५ वं वर्ष*



यंदाचा *‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’* सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे. कारण ह्या वर्षी झी नाट्य गौरव पुरस्काराचं २५ वं वर्ष आहे. अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आणि गाजलेल्या नाटकांमधील प्रवेश हा आकर्षणाचा विषय असणार आहे.



 रंगभूमीवर धमाकूळ घालणार *भरत जाधव* यांचं *"श्रीमंत दामोदर पंत"* प्रेक्षकांना पुन्हा झी नाट्य गौरवच्या मंचावर पाहायला मिळणार आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेलं आणि तिकीटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड लावणार *"शिकायला गेलो एक"* या नाटकामधील प्रवेश *प्रशांत दामले* आणि *हृषिकेश शेलार* सादर करणार आहेत. 





मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सखी गोखले, सुव्रत जोशी, प्रियदर्शन जाधव, अदिती सारंगधर या आणि अश्या अनेक नामवंत कलावंतांची या सोहळ्याला हजेरी लागणार आहे. या सर्वांच्या उपस्थितीने आणि रसिक प्रेक्षकांच्या साथीने हा सुंदर सोहळा रंगणार आहे.  



या सोहोळ्याचे आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे *अभिजीत खांडकेकर* आणि *संकर्षण कऱ्हाडे* यांचं सूत्रसंचालन.  याचसोबत अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरवच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहेत. 




*तेव्हा एका तिकिटात अनेक प्रयोग पाहण्याची नामीसंधी रसिक प्रेक्षकांना असणार आहे, तेव्हा पहायला विसरू नका 'झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५'  ३० मार्च  संध्या. ६ वा. फक्त फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.