Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सूरज चव्हाणच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा "झापुक झुपूक" टिझर रिलीज!*

 *जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे दिग्दर्शित, गुलीगत सूरज चव्हाणच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा "झापुक झुपूक" टिझर रिलीज!*

 

बिग बॉस मराठी सिझन ५ च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाण ने आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच "झापुक झुपूक" ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" चा धमाकेदार टिझर प्रदर्शित झालाय. 



टिझर लिंक जी https://youtu.be/0VDKdTkeTxY


सूरज चा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ज्यात तो 'म्हणतो मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे', असाच त्याच्या "झापुक झुपूक" सिनेमाचा टिझर आहे. दमदार आणि गाजवणारा. टिझर मध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पहायला मिळते, सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल  त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरज ने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची  अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा  त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या ह्या साध्या भोळ्या सूरज साठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. 


सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हल्लीच सूरज ने जेजुरीच्या खंडोबा देवाचे, आईमरी मातेचे आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशन ची जोरदार सुरुवात केली आहे. 


जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.