वायआरएफ ने शेअर केला वॉर 2 चा भन्नाट फॅन-मेड व्हिडिओ, म्हणाले – 14 ऑगस्टला सिनेमागृहांत होणार धुमाकूळ!
मोठ्या पडद्यावर तुफान अॅक्शन आणि थरार पाहायला मिळणार आहे, कारण हृतिक रोशन ऊर्फ कबीर आणि एनटीआर ज्युनियर आमने-सामने येणार आहेत वॉर 2 मध्ये! ही चित्रपट ब्लॉकबस्टर वायआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील वॉर फ्रेंचाइज़ी ची दुसरा भाग आहे.
यशराज फिल्म्स (YRF) ने वॉर 2 बद्दल चाहत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होत एक जबरदस्त फॅन-मेड व्हिडिओ शेअर केला, जो हृतिक आणि एनटीआर ज्युनियर यांच्यातील तीव्र प्रतिस्पर्धा अधोरेखित करतो.
व्हिडिओ येथे पहा: https://x.com/yrf/status/1901143931233923164?s=08
वायआरएफ च्या या पोस्टने वॉर फ्रेंचाइज़ी, हृतिक रोशन, एनटीआर ज्युनियर आणि वायआरएफ स्पाय युनिव्हर्स च्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. या व्हिडिओने वॉर 2 साठीची प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.
वॉर 2 ही वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. याआधी एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि टायगर 3 या फ्रेंचाइज़ीतील सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत.