Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!*

 *स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!* 

पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर! 



 *मुंबई ५ फेब्रुवारी, २०२५ :* कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत आता बाल गणेशाच्या अनेक लीला बघायला मिळणार आहेत ... ज्यामधून पुढे त्यांचं कुटुंब एकत्र येणार आहे. पण, हे करत असताना बालगणेश वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतात, मात्र देवी भवानीशंकर यांना सांगण्याचा प्रयत्न करते की गणेश एकटा जाणार नाही आणि आपल्यात झालेल्या वादाचा राग त्याच्यावर काढू नये. दुसरीकडे,  अशोकसुंदरीच्या मदतीने गणेश एक वाडा बांधण्याची कल्पना मांडतो, पण देवी ती स्पष्ट शब्दांत नाकारते. पद्महंसा जेव्हा या नकारामागील कारण विचारते, तेव्हा देवी तुळजाभवानी अत्यंत सुंदररित्या तिचा दृष्टिकोन समोर मांडते... तिचे म्हणणे आहे "स्त्रीला कुठल्याही लोकात तिचा स्थानासाठी संघर्ष हा करावा लागतोच. ते असं कोणालाच दिलं जात नाही, ते आपण स्वतःच निर्माण करायचं असतं.  स्त्री ही केवळ आई, पत्नी, मुलगी नाही, तर ती स्वतः एक शक्ती आहे. पण जोपर्यंत ती स्वतःचं स्थान ओळखत नाही, तोपर्यंत समाज तिला परावलंबी ठरवतो. कुटुंब ही आपली जबाबदारी आहे, पण स्वतःचं अस्तित्व विसरणं हा त्याग नाही तर ती एक चूक आहे. 



कारण जी स्वतःला विसरते, तिचं अस्तित्वही जग विसरतं. स्त्रीला कोणत्याही चौकटीत अडकवायचं नाही. तिने स्वतःचं विश्व निर्माण करायचं, स्वतःचा मार्ग निवडायचा. स्वतःच्या सन्मानासाठी उभी राहायचं. कैलासात तर माझं घर आहे पण घरासाठी मी पृथ्वीवर आले नसून इथे स्थानासाठी आलो आहोत... हा अवतार घेण्यामागे एक कारण आहे. यातून आताच्या स्त्रीला अतिशय सुंदर असा संदेश देण्यात आला आहे जो प्रत्येक स्त्रीने आत्मसात करायलाच हवं. आता ही गोष्ट पुढे कशी जाणार ? कसे देवीला स्वतः चे स्थान मिळणार हे मालिकेत कळेलच. तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!



दुसरीकडे, बालगणेश तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहे. आणि यासाठीच गणेश देवीकडे येऊन परिसराबद्दल विचारतो, आणि देवी तुळजाभवानी रूपात त्याला परिसर दाखवायला निघते. अशोकसुंदरी महादेवांना एका अंधाऱ्या गुहेतील कुंडाबद्दल सांगून त्यांना मूळ रूपात सोबत येण्यास राजी करते. परिसर दाखवताना देवी एक अनोळखी गुहा पाहून आश्चर्यचकित होते. गणेश आपल्या वाकचातूर्यचा उपयोग करत आई तुळजाला त्या गुहेत एकटी पाठवण्यात यशस्वी होतो तर दुसरीकडे, महादेव गुहेपाशी आल्यावर गणेशाला कैलासावर न परतण्याबद्दल विचारतात. गणेश गुहा पाहण्याचा आग्रह धरतो, गणेश आपल्या या युक्तीमध्ये यशस्वी होईल का ? महादेव आणि आई तुळजा भेट अखेर होईल का ? हे बघणे रंजक असणार आहे. 


तेव्हा नक्की पाहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.