*भक्तांना भयापासून मुक्ती मिळणार,विश्वाला स्वामी 'तारकमंत्रा'ची दीक्षा देणार*
पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!
*मुंबई ६ फेब्रुवारी, २०२५ -* स्वामी भक्तांसाठी यंदाचा फेब्रुवारी महिना खास ठरणार आहे, कारण आहे कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा हा संपूर्ण महिना स्वामी तारकमंत्राच्या अलौकिक महिमेचा आहे. भय संपण्याचं, भय गमावण्याचं... भय मृत्यूचं
सगळ्या भयावर एकच उत्तर... स्वामींचा दिव्य तारकमंत्र. मनुष्याच्या जगण्याला बळ देणाऱ्या आणि जगणे समृद्ध करणाऱ्या तारकमंत्राची स्वामींनी जगाला दिलेली दीक्षा भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांना अनुभवता येईल. या भागाच्या आरंभाचा कलर्स मराठीने प्रसारित केलेला प्रोमो या अलौकिक दिव्य अनुभवाची प्रचिती देणारा आहे.
प्रत्येक घराघरात दररोज ऐकला, बोलला आणि लिहला जाणाऱ्या या तारकमंत्राची महती जय जय स्वामी समर्थ या मालिकेत उलगडणार आहे. या संपूर्ण महिन्याची स्वामी भक्त उत्सुकतेने वाट पाहात असून ही प्रतीक्षा संपून येत्या रविवार नऊ फेब्रुवारीपासून हे कथानक सुरू होईल. तेव्हा नक्की जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!