*शेमारू मराठीबाणा साजरा करत आहे ५ वर्षांचा मनोरंजनाचा प्रवास*
*शेमारू मराठीबाणाचा ५ वर्षांचा मनोरंजनात्मक प्रवास*
मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या चॅनेल्सपैकी एक असलेल्या शेमारू मराठीबाणा ने यशस्वीपणे ५ वर्षे पूर्ण केली आहेत. २०२० मध्ये सुरू झालेल्या या चॅनेलने आपल्या दर्जेदार आणि विविधरंगी कंटेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट सिनेमा, ऐतिहासिक आणि पौराणिक मालिका तसेच भक्तिपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या चॅनेलने मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार कंटेंटचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
शेमारू मराठीबाणाची सुरुवात एक मराठी चित्रपट चॅनेल म्हणून झाली, मात्र अल्पावधीतच त्याने विविध विषयांवरील कंटेंटचा खजिना प्रेक्षकांसमोर आणला. आज हे चॅनेल १ कोटीहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलं असून, पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, लोकप्रिय मराठी चित्रपट, तसेच भक्तिपूर्ण कार्यक्रमांसाठी हा प्रेक्षकांचा पहिला पर्याय बनला आहे.
या खास टप्प्यावर शेमारू एंटरटेनमेंटचे सी.ई.ओ हिरेन गडा म्हणाले, _"शेमारू मराठीबाणा पाचव्या वर्धापनदिनी पोहोचल्याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी मनोरंजनाला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रवासाला सुरुवात केली होती आणि आज हा चॅनेल महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. दर्जेदार आणि अनोखा कंटेंट सादर करण्याची आमची बांधिलकी या यशामागची खरी प्रेरणा आहे."_
शेमारू एंटरटेनमेंटचे सी.ओ.ओ (ब्रॉडकास्टिंग बिझनेस) संदीप गुप्ता म्हणाले, _"शेमारू मराठीबाणाचा पाच वर्षांचा प्रवास हा प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाचा ठोस पुरावा आहे. चॅनेलने केवळ मनोरंजन दिले नाही तर मराठी संस्कृतीशी जुळवून घेत वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंट प्रयोगांद्वारे प्रेक्षकांशी दृढ नाते निर्माण केले. पुढेही प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी-निवडी लक्षात घेऊन अधिक आकर्षक आणि दर्जेदार कंटेंट देण्याचा आमचा मानस आहे."_
इतर चॅनेल्स जेव्हा नवीन शो तयार करण्यावर भर देत होते, तेव्हा शेमारू मराठीबाणा ने केवळ ओरिजिनल कार्यक्रम सादर केले नाहीत, तर इतर भाषांतील गाजलेल्या मालिका आणि चित्रपट मराठीत डब करण्याचा नवा ट्रेंडही लोकप्रिय केला आज चॅनेलकडे सर्वाधिक मराठीत डब केलेल्या कार्यक्रमांचा संग्रह आहे. 'रामायण', 'श्रीकृष्ण', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई', 'पवनपुत्र हनुमान', 'साई माझे तारणहार' आणि लोकप्रिय गुन्हेगारी मालिका 'CID' यासारख्या कार्यक्रमांनी मराठी प्रेक्षकांना समृद्ध अनुभव दिला आहे.
चित्रपटप्रेमींना घरबसल्या सिनेमा पाहण्याचा अनुभव मिळावा यासाठी शेमारू मराठीबाणाने ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’चे मराठी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केले, ज्यामध्ये मराठी कलाकारांचे आवाज दिले गेले. प्रेक्षकांना अधिक नैसर्गिक अनुभव मिळावा यासाठी या चित्रपटातील गाणी मराठीत पुन्हा लिहिण्यात आली. 'काळूबाईच्या नावानं चांगभलं', 'रेणुका आई लय भारी' यांसारख्या हिट मराठी चित्रपटांसोबतच 'बेटा', 'गोलमाल: फन अनलिमिटेड', 'फिर हेरा फेरी', 'वेलकम' यांसारख्या हिंदी सिनेमांचेही मराठी प्रेक्षकांसाठी खास टेलिकास्ट करण्यात आले.
भक्तिपूर्ण कार्यक्रमांसाठी ओळखला जाणारा हा चॅनेल ‘गजर माऊलीचा’ आणि ‘आनंदवारी’ यांसारख्या कीर्तन-भजन कार्यक्रमांसह महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भावनिक नात्याला साद घालतो. ‘गजर माऊलीचा’ हा पंढरपूर मंदिरात शूट करण्यात आलेला पहिला कार्यक्रम असून, हा अनोखा उपक्रम चॅनेलने केला आहे. त्याचप्रमाणे 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' आणि 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' यांसारख्या ओरिजिनल शोजने देखील चॅनेल प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे.
पुढील प्रवासाबद्दल बोलताना चॅनेलने स्पष्ट केले की, "प्रेक्षकांना भावणारा दर्जेदार आणि अर्थपूर्ण कंटेंट आणण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील." शेमारू मराठीबाणाचा हा यशस्वी प्रवास प्रेक्षकांसाठी समर्पित असून, येत्या काळात आणखी मनोरंजक आणि संस्मरणीय कार्यक्रमांसह प्रेक्षकांसमोर येण्याचे आश्वासन दिले आहे.