Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"आरडी' चित्रपटाचं पोस्टर लाँच*

*"आरडी' चित्रपटाचं पोस्टर लाँच*


*थरारक 'आरडी' येतोय २१ मार्चला*

*नव्या दमाच्या कलाकारांचा 'आरडी'*


आयुष्य सुरळीत सुरू असताना एका धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी  "आरडी" या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या  २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. 



साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख  हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे. 


एका तरुणाच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना

 घडते. हा तरुण त्या घटनेचा तपास मित्राच्या मदतीने करू लागतो पुढे अजुन काय घडते?  याची अतिशय  रंजक गोष्ट "आरडी" या चित्रपटात पहायला मिळणार आहे. पोस्टरवरूनच हा चित्रपट अतिशय स्टायलिश असल्याचं जाणवत आहे. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल वाढलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य असून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २१ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.