*अप्पीला घरात पाहून अमोलचा आनंद अनावर*
*अपघातानंतर अप्पीला पाहून घरातल्यांचा तिच्यावर प्रश्नांचा भडिमार*
*'अप्पी आमची कलेक्टर'* मालिकेत अमोलच्या निर्धाराने प्रभावित होऊन, अर्जुन नरसोबाची वाडीला जातो. तो आदल्यादिवशी पाहिलेल्या मुलीबद्दल अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर दीपाला पाहिलंय. यावेळी, दीपाचा रांगडा स्वभाव त्याला दिसतो. ती एका माणसाला झाऱ्याने मारण्याची धमकी देते आणि त्याच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतेय. हे बघून अर्जुन संभ्रमित आहे. कोण आहे ही मुलगी ? तिच्या कुटुंबाचा इतिहास काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तो तिचा पाठलाग करतो. पाठलाग करताना अचानक ती त्याच्यासमोर येऊन विचारते, "तू माझा पाठलाग का करत आहेस?" अर्जुन खोटं सांगतो की त्याला वाटत ही त्याची नातेवाईक आहे. मात्र, तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवतं की ही अप्पी नसावी.
दरम्यान, घरी पत्रकार अमोलला त्याच्या आईविषयी प्रश्न विचारतात. अमोल गोंधळून जातो. हळूहळू, त्याच्या मनात भीती निर्माण होते की अप्पी आता या जगात नाही. या सगळ्या गोंधळामुळे अमोल रडायला लागतो. त्याच वेळी, चिंचुकेचा अर्जुनला फोन येतो—वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्पीच्या अपघाताचा तपशीलवार अहवाल मागितला आहे आणि तो उद्या सादर करायचा आहे. अर्जुनवर एकाच वेळी अनेक प्रश्नांचा भार पडतो. अप्पी जिवंत आहे का? असेल तर कुठे आहे? नसेल तर अमोलला काय उत्तर द्यायचं? अर्जुन ठरवतो की तो अप्पीला परत आणणार! अप्पी परत येणार? अर्जुन आता दीपाला भेटून काही दिवस फक्त अमोलची तिने अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे. दीपा घरी आल्यामुळे अमोल आणि घरची मंडळी आनंदात आहेत. सगळे तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करत्यात.
*अमोलच्या या आनंदाला कोणाची नजर तर नाही लागणार ? दीपा कश्या प्रकारे घरातल्यांच्या प्रश्नांचा सामना करणार ? यासाठी बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*