*पुण्यातील येरवडा जेल मध्येही पाहिली जाते 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका*
*पुण्यातील येरवडा जेल मधूनही 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेला पसंती*
*बाबा दुबईमध्ये न चुकता मालिका पाहतात.*
'सन मराठी'वरील 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका सुपरहिट ठरली आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. सत्या व मंजूला एकमेकांसमोर प्रेमाची कबुली कधी देणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण सत्याने मंजूला प्रपोज केल्यानंतर मंजूने सत्याला नकार दिला. हा एपिसोड पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. सत्या व मंजू यांचा दुरावा पाहून प्रेक्षकही भावूक झाले होते. पण आता हा दुरावा लवकरच संपून सत्या-मंजू नव्याने एकत्र येणार असून मंजू सत्या समोर तिच्या प्रेमाची कबुली फेब्रुवारी महिन्यात देणार आहे. मालिकेचे नवे भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता वाढली आहे. कलाकारांना प्रेक्षकांची पोचपावती वेळोवेळी मिळत असते. या मालिकेत सत्या ही भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदमने प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल एक किस्सा शेअर केला आहे.
"'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेचं शूटिंग सातारा मध्ये सुरु असल्याने मी जेव्हा ही साताऱ्यात फिरत असतो तेव्हा सत्या दादा अशी हाक मला मारली जाते. हे ऐकून आपल्या माणसांनी हाक मारली असं जाणवत. नुकतंच आम्हाला कळलं की, येरवडा जेल मध्ये न चुकता 'कॉन्स्टेबल मंजू' मालिका पाहिली जाते. आमच्या सेटवर महिला पोलीस आल्या होत्या तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितलं की, जेल मध्ये ज्या महिला कैदी आहेत त्या आमच्याकडे हट्ट करतात रात्री ८ वाजता आम्हाला 'सन मराठी' चॅनेल लावून द्या. हे सगळं ऐकून मी भारावून गेलो. या मालिकेमुळे मला एक नवी ओळख मिळाली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून काम करण्याची ऊर्जा येते."
यापुढे वैभव म्हणाला की, "माझे बाबा दुबईमध्ये राहतात त्यामुळे दुबईमधून ते माझी मालिका पाहतात व रोज रात्री फोन करून आजच्या भागात काय घडलं, कोणता सीन उत्तम झाला किंवा अजून मी कोणती गोष्ट छान करू शकलो असतो हे सांगतात. खरंच या मालिकेमुळे माझं आयुष्य बदलून गेलं आहे. हे सगळं श्रेय 'सन मराठी' चॅनेल, मालिकेची संपूर्ण टीम, माझं कुटुंब व प्रेक्षकवर्गाला जात. प्रेक्षकांना इतकंच सांगायला आवडेल मालिकेवर खूप प्रेम करा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहचवत जा आणि आता लवकरच सत्या- मंजू एकत्र येणार आहे त्यामुळे एकही भाग चुकवू नका. बघत रहा तुमची आवडती मालिका 'कॉन्स्टेबल मंजू' सोम- रवि रात्री ८.०० वाजता आपल्या सन मराठीवर. "