Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

IMDb द्वारे 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा

 IMDb द्वारे 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा

 

जगभरातील IMDb ग्राहकांच्या कोट्यवधी पेज व्ह्यूजनुसार 2025 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट सिकंदर आहे


मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.



सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये क्र. 1 वर असलेल्या सिकंदर चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदोस, ह्यांनी म्हंटले, “2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सिकंदर पहिल्या स्थानी बघून मला अतिशय आनंद वाटत आहे. सलमान खानसोबत काम करणे विलक्षण होते. त्याच्या ऊर्जेमुळे व कामाबद्दलच्या निष्ठेमुळे अनेक  अर्थांनी सिकंदर जीवंत झाला आहे व हे शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही. हे घडवून आणल्याबद्दल साजिद नाडियदवालाला खूप धन्यवाद. सिकंदरमधील प्रत्येक दृश्य अविश्वसनीय खूण राहील अशा प्रकारे बनवलेले आहे. प्रत्येक क्षण असा यावा जो प्रेक्षकांना नेहमीसाठी लक्षात राहील, अशा प्रकारे मी त्यामध्ये जीव ओतला आहे.”


2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट

1. सिकंदर

2. टॉक्सिक

3. कूली

4. हाऊसफुल 5

5. बाग़ी 4

6. राजा साब

7. वॉर 2

8. L2: एंपुरान

9. देवा

10. छावा

11. कन्नप्पा

12. रेट्रो

13. ठग लाईफ

14. जाट

15. स्काय फोर्स

16. सितारे जमीन पर

17. थामा

18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1

19. अल्फा

20. थांडेल


उल्लेखनीय आहे की, जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार 2025 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी ही टायटल्स IMDb ग्राहकांमध्ये सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होती.


विशेष म्हणजे ह्या यादीतील 20 टायटल्सपैकी 11 हिंदी आहेत, तीन तमिळ व तेलुगू आहेत, दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. ह्या यादीतील तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), कन्नाप्पा (क्र. 11) आणि स्काय फोर्स (क्र. 15) आणि रश्मिका मंदानासुद्धा तितक्याच चित्रपटांमध्ये आहे: सिकंदर (क्र. 1), छावा (क्र. 10) आणि थामा (क्र. 17). मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी प्रत्येकी दोन चित्रपटांतील भुमिकांमध्ये आहेत. ह्या यादीतील पाच टायटल्स प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), बाग़ी 4 (क्र. 5), वॉर 2 (क्र. 7), सितारे ज़मीं पर (क्र. 16), आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर 1 (क्र. 18).


हे चित्रपट कधी उपलब्ध होतील, ह्याचे अलर्टस मिळवण्यासाठी IMDb ग्राहक ही व अन्य टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात. 2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.