Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सचिन पिळगांवकर प्रस्तुत करत आहेत ‘स्थळ’!*

*सचिन पिळगांवकर प्रस्तुत करत आहेत ‘स्थळ’!*


- *आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या 'स्थळ' चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण*

*जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित "स्थळ"*


- *आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी 'स्थळ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला*



अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन  प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित "स्थळ" या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला "स्थळ" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "स्थळ" चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी "स्थळ" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. "स्थळ" हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.



सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पाहिले होता. ख़ास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत "नाफा" फिल्म फेस्टिवल मध्ये मी आणि सुप्रियाने "स्थळ" हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता.महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. "स्थळ"  चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला.  चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.