Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’*

 *‘घडा घडा बोलायचं’मध्ये भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा म्युझिकल चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटिस*


*मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’*



*भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा स्टायलिस अंदाज ‘घडा घडा बोलायचं’ या चित्रपटात पाहायला मिळणार.*

मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार हा स्पष्ट वक्ता आहे आणि म्हणूनच जे आपल्या मनात असतं तेच  आपल्या ओठांवर असतं. अस म्हणत भूषण प्रधान आपला आगामी सिनेमा घेऊन येत आहे ज्यांच नाव आहे ‘घडा घडा बोलायचं’. या सिनेमाचं नाव येवढं भारी आहे की, या चित्रपटाची गाणी आणि डायलॉगसमध्ये किती वजन असेल यांचा नक्की विचार करायला प्रेक्षकांना भाग पाडणार हा चित्रपट आहे . 

‘घडा घडा बोलायचं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे असून या चित्रपटात भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पटाखा’ फिल्म्स प्रस्तुत ‘घडा घडा बोलायचं’ हा चित्रपट एक संगीतमय रोमँटिक चित्रपट असणार आहे.

‘माजा माँ’ या सिनेमात माधुरी दिक्षितच्या तरुणपणीची भूमिका साकारणारी सिमरन नेरुरकर या सिनेमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहे. आरोह वेलणकरला त्याच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फनरल, चंदू चॅम्पियन, धर्मवीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमवटवल्यानंतर आता एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे.  



‘घडा घडा बोलायचं’ या चित्रपटाच्या निमित्ताने पटाखा फिल्मस प्रस्तुत आरती साळगावकर आणि सुहास साळगावकर निर्मित त्यांचा हा पहिलावहिला मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन नितीन रोकडे तर पटकथा राकेश शिर्के आणि महेंद्र पाटील यांनी केली आहे तर संवाद राकेश शिर्के यांनी केलं आहे. जय अत्रे, संगीत प्रफुल्ल स्वप्नील, यांनी केलं आहे. छायालेखक मंजुनाथ नायक, संपादक निलेश गावंड, कला दिग्दर्शक- डेव्हिड सोरेस, पोस्ट प्रोडक्शन हेड-रवी खंडेराव आहेत.  

या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद पाठक, किशोर चौगुले, पंकज विष्णू, राहुल बेलापूरकर, विशाल अर्जुन, पूनम चांदोरीकर, चित्रा कोप्पीकर या कलाकारांचा देखिल समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.