Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर' या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात पार पडला

 *अॅक्रोश्री प्रस्तुत 'तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर' या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात पार पडला.*



*प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे 'तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर' या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण*


*शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं 'तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर' गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!*



शाळेतला वर्ग, मित्रमैत्रीणी, बाक, गृहपाठ, मधली सुट्टी या आठवणी माणूस कधीच विसरू शकत नाही. अशीच शाळेतील एक सुंदर आठवण सांगणार अॅक्रोश्री प्रस्तुत 'तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्या हस्ते व अनेक बालकलाकारांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. जॉली एलएलबी २, चुंबक, सोनू के टिटू की स्वीटी अश्या अनेक बॉलिवूड सिनेमांची निर्मिती महेश कोरडे यांनी केली आहे. 

या गाण्याची निर्मिती व कोरिओग्राफी सुशील ओहळ यांनी केली असून या गाण्याचे बोल त्यांनीच लिहीले आहेत. राहुल देसले याने हे गाण गायल असून रुपेश गोंधळी यांचं संगीत आहे. गाण्याचे दिग्दर्शन सुशिल ओहळ आणि चेतन पवार यांनी केले आहे. या गाण्यात आर्य कशिवले, राहुल लोणे, आरोही शेठे, सर्वेश पवार हे प्रमुख कलाकार आहेत. आणि सह बालकलाकार भविका भोईर, रुई लोणे, अनवेशा गंधे, हेमांगी गंधे, प्रची पवार, नक्षत्र पारधी इत्यादी हे आहेत. 


प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माता सुशिल ओहळ गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “ऍक्रोबॅटीक नृत्याद्वारे त्यात भारताचा इतिहास दर्शवणे या नृत्यप्रकारावरून अॅक्रोश्री या नावाची उत्पत्ती झाली. आणि हा नृत्य प्रकार माझ्या नावावर रजिस्टर करण्यात आला. माझ्या डान्स अॅकॅडमीचं नाव श्री डान्स अॅकॅडमी आहे. प्रत्येक पेन्सिलला शार्पनरची गरज असते. कारण पेन्सिलला शार्पनर केल्यावरचं आपण सुंदर अक्षर लिहू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एका जोडीदाराची गरज असते. तरच आयुष्याचं गणित आपण सोडवू शकतो. अश्याप्रकारे या गाण्याची संकल्पना मला सुचली. 



पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतो, “महाराष्ट्रातील खडवली या गावात या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्यातील नयनरम्य ठिकाणांनी गण्याचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्यातील सर्व कलाकार नवीन असल्याकारणाने आम्हाला सुरुवातीला विशेष मेहनत करावी लागली. परंतु नंतर काही सीन्स वन टेक मध्येच त्यांनी पूर्ण केले. माझा सगळ्यात आवडता सीन म्हणजे आजी आणि लहान मुलांसोबतचा गाण्यातील पाहिलाच सीन. त्या सीनला आम्ही खूप टेक्स घेतले. जवळपास अर्धा दिवस त्या सीन ला लागला पण खूप मज्जा आली तो सीन शूट करताना. सोशल मीडियावर प्रेक्षकांना तो सीन जास्त आवडल्याचं ते कमेंट्सद्वारे सांगत आहेत. हे पाहून माझा आनंद गगनात मावत नाहीय. तुम्ही सुद्धा हे गाण तुमच्या शाळेच्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा. आणि माझ्या पुढील सर्व गाण्यांवर असच प्रेम करा.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.