नव्या वर्षाची भक्तिमय सुरुवात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी ने घेतलं तिरुपती बालाजीच दर्शन !
निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशी कायम चर्चेत असलेला अभिनेता आहे आणि तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. २०२५ हे वर्ष स्वप्नील साठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारण देखील आहेत.
स्वप्नील ने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन २०२५ वर्षाची भक्तिमय सुरुवात केली आहे. वर्षाची एवढी सुंदर सुरुवात करून त्याने त्याचा २०२५ मध्ये कामाला सुरुवात केली आहे.
२०२५ मध्ये स्वप्नीलचे अभिनेता आणि निर्माता म्हणून अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या महिन्यात १७ जानेवारी ला " जिलबी " नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुढे स्वप्नील त्याची निर्मिती आणि अभिनय असलेला " सुशीला - सुजीत " साठी सज्ज होत आहे तर वर्ष संपताना स्वप्नील ने अजून एका चित्रपटाची घोषणा केली चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नीलच्या कामाची यादी इथेच थांबत नाही तर तो या वर्षात गुजराती सिनेमात देखील झळकणार आहे.
एकंदरीत काय नवीन वर्ष स्वप्नील साठी चित्रपटमय ठरणार आहे !
https://www.instagram.com/reel/DETylpezHtq/?igsh=MWprNTd2M3VlemI4MA==