Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्टार प्रवाहच्या उदे गं अंबे मालिकेत सुरु होणार नवा अध्याय*

 *स्टार प्रवाहच्या उदे गं अंबे मालिकेत सुरु होणार नवा अध्याय*


*शाकंभरी उत्सवाच्या मंगल पर्वात मालिकेतून उलगडणार रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा*



साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर, आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. मालिकेत आता पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे. रेणुका मातेने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं. रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट उदे गं अंबे मालिकेतून अनुभवता येणार आहे. 

 

पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या आदिशक्तीचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार, एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना तडफडू लागले. देवीला या परिस्थितीवर करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. शाकंभरी देवीच्या अवताराचा हा दिवस अर्थातच पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची ही गोष्ट मालिकेतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका उदे गं अंबे सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.