Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

४० आर्ट गॅलऱ्या आणि ५५० हून अधिक कलाकारांच्या ५,५०० पेक्षा जास्त कलाकृतींचा भव्य महोत्सव!

 *४० आर्ट गॅलऱ्या आणि ५५० हून अधिक कलाकारांच्या ५,५०० पेक्षा जास्त कलाकृतींचा भव्य महोत्सव!  १३ वा इंडिया आर्ट फेस्टिव्हला लवकरच सुरुवात...*



*मुंबई, 20 जानेवारी २०२५:* मुंबईच्या नेहरू सेंटर, वरळी येथे २३ ते २६ जानेवारी दरम्यान १३ वा इंडिया आर्ट फेस्टिव्हल भरवला जाणार आहे. या महोत्सवात ४० आर्ट गॅलरी आणि ५५० हून अधिक कलाकारांची ५,५०० पेक्षा जास्त कलाकृती प्रदर्शित होतील.


दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये मिळालेल्या जबरदस्त यशानंतर मुंबईतला हा फेस्टिव्हल कला प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. यात समकालीन, पारंपरिक, आणि आधुनिक कलेचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. निसर्गचित्रं, ग्रामीण आणि शहरी जीवनावर आधारित कलाकृती, फ्युचरिस्टिक आर्ट, आणि मूर्तिशिल्पांनी सजलेला हा सोहळा कलाप्रेमींसाठी पर्वणीच ठरेल.



यंदाचा उत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिक रंगतदार होणार आहे. लाईव्ह पेंटिंग डेमो, फ्युजन शो, आणि लाईव्ह म्युझिकच्या साथीनं कलेचं हे प्रदर्शन अधिक सजीव होईल. विशेषतः "दि इटर्नल कॅनव्हास – १२,००० वर्षांचा भारतीय कलेचा प्रवास" हा चित्रपट भारतीय कलेच्या समृद्ध इतिहासाचं दर्शन घडवेल.


राजेंद्र पाटील, फेस्टिव्हलचे संस्थापक आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, या सोहळ्याच्या मागची प्रेरणा सांगताना म्हणतात, "उभरत्या आणि मध्यम पातळीच्या कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे."



या प्रदर्शनात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, सिंगापूर आणि इतर ठिकाणांहून आलेल्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय गॅलरींनी सहभाग घेतला आहे. ग्नानी आर्ट्स, बियॉन्ड द कॅनव्हास, स्टुडिओ ३ आर्ट गॅलरी अशा प्रतिष्ठित गॅलरींच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मोहित केलं आहे. नवोदित कलाकारांपासून ते प्रथितयश कलाकारांपर्यंत सर्वांचे योगदान या फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरतं.


कलाप्रेमींनी ही सुवर्णसंधी चुकवू नये. भारतीय कलेच्या विविध छटा अनुभवण्यासाठी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्यासाठी या फेस्टिव्हलला आवर्जून भेट द्या.


प्रदर्शन स्थळ: नेहरू सेंटर, वर्ली, मुंबई

तारीख: २३ ते २६ जानेवारी २०२५

वेळ: सकाळी ११ ते रात्री ८


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.