Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अमोल आजारातून शाळेत परतल्यावर करावा लागला छेडखानिचा सामना*

*अमोल आजारातून शाळेत परतल्यावर करावा लागला छेडखानिचा सामना*

*अप्पी- अर्जुनची राजकारण्यांशी लढाई !*



'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सर्व आपल्या दैनंदिन दिनचर्येवर परत आले आहेत आणि अमोलच्या आजारनंतर तो पहिल्यांदा शाळेत जायला लागला आहे. संपूर्ण कुटुंब त्याला मदत करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्यांची वाटणी करतात. अमोलचे त्याचे मित्र शाळेत घेऊन जाण्यास येतात, आणि सर्वाना तो सामान्य जीवन जगताना बघून खूप आनंद होतो. मात्र शाळेत काही मुलं अमोलला केस नसण्यावरून चिडवतात. हे पाहून अमोलचे  मित्र रागावतात, पण अमोल शांतपणे सर्वांना खेळ सुरू ठेवायला सांगतो. अमोल आणि त्याचे मित्र तो खेळ जिंकतात. घरातले शाळेतील छेडछाड संदर्भातील घटना ऐकतात आणि काळजी करतात. रुपाली अमोलला होमस्कूलिंग करण्याचा सल्ला  देते. पण अप्पी आणि अर्जुन त्याच्या विरोधात आहेत, कारण त्यांचा विचार आहे की शाळेचे शिक्षण अमोलच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. ते अमोलच्या शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतात. इकडे एका सूत्राच्या टिपनुसार अर्जुन एका गोदामात धाड टाकतो, जिथे बालमजुरी करणाऱ्यांना फसव्या ओळखपत्रांखाली राबवलं जात आहे.



 तो आरोपींना अटक करून त्या लहान मुलांना मुक्त करतो. ते गोदाम एका प्रतिष्ठित राजकारण्याचे आहे, ज्यामुळे त्याचा राग अनावर होतो. सुरुवातीला तो अर्जुनला लाच देण्याचा प्रयत्न करतो पण नकार मिळाल्यावर तो राजकारणी अर्जुनला धमकावतो. यात अप्पी- अर्जुनच्या बाजूने ठामपणे उभे आहे आणि सत्य समोर आणण्याच्या त्याच्या निर्णयास पाठिंबा देते. राजकारणी प्रतिशोध म्हणून रात्री अप्पी  आणि अर्जुनच्या घरात गुंड पाठून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन त्यांना पकडतो आणि त्यांचा कट फसतो. ही घटना कुटुंबाला हलवून टाकते, पण ते अप्पी  आणि अर्जुनला विनंती करतात की अमोलसाठी त्यांचा आपला लढा थांबवावा.  


आता अप्पी- अर्जुन आपली सत्याची लढाई थांबवतील का? यासाठी बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' सोमवार ते शनिवार संध्या. ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.