Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत 'बायडी' या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात

’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत 'बायडी' या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांच्यासोबत जल्लोषात पार पडला.*



*नेटकऱ्यांना ट्रेंड करायला भाग पाडणार पुष्कर जोग आणि पूजा राठोड यांचं ‘बायडी’ गाण प्रदर्शित*


*वर्षातील पहिलच धमाकेदार ‘बायडी’ गाण प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!*



यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत 'बायडी' गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे, दिग्दर्शक अभिजीत दाणी, निर्माता विशाल राठोड व अन्य कलाकारांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला.


‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड हे प्रमूख कलाकार आहेत तर या गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. या गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे असून प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 



अभिनेता पुष्कर जोग गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो,”मला नवनवीन प्रोडक्शन्स सोबत काम करायला फार आवडत. मला या गाण्यासाठी विचारण्यात आल तेव्हा मी त्यांना हो सांगितला गाण नाशिकमध्ये शूट करताना खूपच जास्त मज्जा आली. गाण्याच्या हुक स्टेप फार कॅची आहेत त्यामुळे गाण्याच्या रिहर्सलला आम्ही फार धम्माल केली. वी आर म्युझिक स्टेशनचे मी आभार मानतो की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. सोशल मीडियावर मला कमेंट्स येत आहेत ‘क्यूट डीजेवाला’ हे पाहून फार आनंद झाला. या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम करावे हीच अपेक्षा आहे. गाण तुम्हाला कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”


अभिनेत्री पूजा राठोड सांगते,”पुष्कर सर यांच्यासोबत गाण्यात काम करण्याची संधी मला वी आर म्युझिक स्टेशन यांनी दिली त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. माझ्यासाठी हे गाण म्हणजे ड्रीम कम ट्रू असा मोमेंट होता. पुष्कर सरांसोबत गाण शूट करताना खूप मज्जा आली. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाण लवकर सुपरहिट व्हाव हीच इच्छा.”


Link - https://yt.openinapp.co/4lo1x

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.