रश्मिका मंदान्नाची हॅट्रिक
मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.
रश्मिका मंदान्ना तीन प्रमुख भूमिकांमधील चित्रपटांसह IMDb च्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे. IMDb यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला चित्रपट 'सिकंदर', जो ए.आर. मुरुगदॉस यांनी दिग्दर्शित केलेला ऍक्शन ड्रामा आहे, ज्यात रश्मिका सलमान खानसोबत झळकणार आहे. ऐतिहासिक ड्रामा 'छावा' (क्रमांक १०), ज्यामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, रश्मिका यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या थामा (क्रमांक १७) या बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे, जो यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होईल.
आपल्या भावना व्यक्त करताना रश्मिका म्हणाली, “माझे ३ आगामी चित्रपट IMDb च्या २०२५ मधील सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत पाहून मला खूप छान वाटतंय. २०२४ चा शेवट पुष्पा २ च्या जबरदस्त प्रतिसादाने झाला आणि २०२५ ची सुरुवात तीन आगामी चित्रपटांच्या यादीत समावेशासह झाली हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि त्यांच्या मनाला भावणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याचे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे, आणि हेच मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देते. माझ्या चाहत्यांचे आणि या चित्रपटांच्या टीममधील प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानते, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं.”
2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट:
1. सिकंदर
2. टॉक्सिक
3. कूली
4. हाऊसफुल 5
5. बाग़ी 4
6. राजा साब
7. वॉर 2
8. L2: एंपुरान
9. देवा
10. छावा
11. कन्नप्पा
12. रेट्रो
13. ठग लाईफ
14. जाट
15. स्काय फोर्स
16. सितारे जमीन पर
17. थामा
19. अल्फा
20. थांडेल