*'हिट गर्ल' शर्वरीने भावनिक पोस्टद्वारे सांगितला तिच्या अविस्मरणीय वर्षाचा प्रवास, सर्वांचे मानले आभार!**
2024 मध्ये शर्वरीने बॉलिवूडमधील उगवत्या ताऱ्यांमध्ये स्थान मिळवत दाखवून दिलं की, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर बाहेरून आलेल्यांनाही मोठं यश मिळू शकतं. *मुंज्या*, *महाराज* आणि *वेडा* यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट भूमिकांमुळे ती प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरत, अनेक होतकरू कलाकारांसाठी प्रेरणास्थान बनली.
2025 च्या सुरुवातीला, शर्वरीने सोशल मीडियावर तिच्या प्रवासाचा आणि गेल्या वर्षाचा आढावा घेत, कृतज्ञता व्यक्त करत लिहिलं:
"2025 सुरू होत असताना... मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला पाठिंबा दिला, प्रेम दिलं, माझ्यासाठी चांगलं चिंतलं, मला संधी दिली, माझ्या चुका समजून घेतल्या, माझं ऐकलं, माझ्या स्वप्नांना महत्त्व दिलं, माझ्या वयावर किंवा लिंगावरून मला नाकारलं नाही, मला व्यक्त होण्याची मुभा दिली, आणि माझ्या सुखदुःखात मला विचारपूस केली. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. मनापासून धन्यवाद ❤️"