*"लीलाचा हा लुक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं" - वल्लरी विराज*
*न्यू इयर पार्टी मध्ये एजे करणार लीलाला प्रोपोज*
*'नवरी मिळे हिटलरला'* मालिकेत नवीन वर्षात नवीन धमाके होणार आहेत ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टी मध्येच सुरु झाली आहे. एजेला अखेर जाणीव झालेय की त्याचं लीलावर प्रेम आहे. लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवायची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते. लीला तीच न ऐकता स्वतःच्या पद्धतीनी चहा बनवून एजेला देते. एजे चहा पिताना लीला म्हणते, "तुम्ही माझं हृदय जिंकलंय, आता माझ्यासाठी काहीतरी खास करा." हे सर्व पाहून दुर्गाला येतो. एजे विश्वाला आयडिया विचारण्यासाठी कॉल करतो, पण सर्व आयडिया नाकारतो. त्याच्या खोलीत एजे एका पांढऱ्या गुलाबांच्या बुकेसह उभा आहे आणि लीला हे पाहून खुश होते. एजे दुर्गाला एक साधी घरगुती नववर्ष पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो, ज्यामुळे दुर्गा आश्चर्यचकित होते. विश्वरूप दुर्गाला सांगतो की एजेला कोणालातरी "आय लव्ह यू" म्हणायचं आहे, जे ऐकून दुर्गा असं कधीच होणार नाही असे म्हणते. लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात. एजे आणि सुनाही पार्टीसाठी तयार होतात, आणि सर्वजण लीलाला उशिर होणार हे गृहीत धरतात. एजे सर्वांना सांगतो की जरी लीला उशीरा आली तरी, ती परफेक्ट दिसेल. लाइट्स गेल्यावर, लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉटलाइटमध्ये येते. सर्वजण तिच्या दिसण्यावर हसू लागतात.
नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला हटके प्रपोज करणार आहे. *या धमाकेदार एपिसोडबद्दल लीलाची भूमिका साकारत असलेली वल्लरी विराज म्हणते* , "लीला एक फिल्मी कॅरेक्टर म्हणून तयार होऊन येते. ती अशी का आणि कशी तयार होऊन येते हे तुम्हाला सविस्तर एपिसोड मध्ये पाहायला जास्त मज्जा येईल. लीलाच हा जो लुक आहे तो एका सिनेमा मधला आहे आणि हाच लुक का याच्याही मागचं एक कारण आहे. आम्ही या लुकसाठी खूप लुक टेस्ट केल्या आणि मग जाऊन हा लुक फायनल केला गेला. पहिले तर जेव्हा ह्या लूकमध्ये तयार झाले तेव्हा मला कसं तरी वाटलं कारण लीला नेहमी गोड आणि छान तयार होते. दिग्दर्शकानी मला या लुक मागचा थॉट समजावला कसं स्टोरी आणि लीलाच्या कॅरॅक्टरला फायदा होणार आहे. त्यानंतर सगळं छान होऊन गेले. माझा लुक पाहून टीमला खूप हसू येत होत, पण मी नर्वस होईन या भीतीने कोणी हसलं नाही. एक अभिनेत्री म्हणून मला हे शिकायला मिळालं कि आपल्या लुकबद्दल विचार न करता काम करता आलं पाहिजे. प्रेक्षकांना हा सीन पाहायला नक्कीच आवडेल यात एजेच रिएक्शन बघणं हे ही मनोरंजक असणार कारण आता तो लीलाच्या प्रेमात पडला आहे. "
*बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' रोज रात्री १०:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*