Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वल्लरीच्या स्वप्नानांना मिळणार उंच भरारी

 वल्लरीच्या स्वप्नानांना मिळणार उंच भरारी

पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.


मुंबई २९ जानेवारी, २०२५ : कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पिंगा गर्ल्सची मैत्री आता हळूहळू घट्ट होताना दिसून येत आहे. ज्याप्रकारे त्या एकमेकींची साथ देत आहेत, काळजी घेत आहेत त्याला बघून तर हेच वाटत आहे कि आता हि या मैत्रीचे अनेक रंग बघायला मिळणार आहेत. वल्लरी एक उत्तम गृहिणी तर आहेच पण तिची काही स्वप्ने आहेत. तिला वकील व्हायचे आहे. समाजात तिचं एक स्थान निर्माण करायचे आहे, आणि त्यासाठी तिच्या सासू विरोधात तिचा लढा सुरु आहे. सासूच्या विरोधाला ठामपणे सामोरं जाण्याचे बळ तिला तिच्या नवऱ्याच्या साथीमुळे मिळत आहे. आणि त्यामुळेच आज ती तिचे स्वप्नं पूर्ण करू पाहते आहे ज्यामध्ये तिला पिंगा गर्ल्सची देखील साथ मिळते आहे. प्रत्येक गृहिणीच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे धाडस वल्लरीमुळे मिळेल हे म्हणायला हरकत नाही. समाजातील प्रत्येक स्त्रीला वल्लरीच्या पात्राला बघून एक सकारात्मक दृष्टिकोन मिळेल हे नक्कीच! मालिकेत आता सुमन नावाची आलेली मुलगी वल्लरीच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ आणणार? सुमनला वल्लरीची सवत बनवण्याचा इंदुमतीचा म्हणजेच तिच्या सासूचा डाव यशस्वी होणार का ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा नक्की पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.   




पाचही जणींच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असूनही त्या मैत्रीचा हात धरून आहेत. वल्लरीच्या मदतीपासून त्यांच्या जिवलग मैत्रीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. प्रेरणा जुन्या आठवणींना मागे टाकून नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तर, नुकतंच श्वेताने वल्लरीच्या सासरी जाऊन तिच्या सासूला चांगलाच इंगा दाखवला आणि त्यामुळे वल्लरीची सासू सुतासारखी सरळ झाली. तर दुसरीकडे तिचे सासरे तिच्यामागे खंबीरपणे  उभे आहेत. वल्लरीचा नवरा तिच्या प्रत्येक स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीशी उभा आहे. वल्लरीच्या शिक्षणाच्या विरोधात असलेली वल्लरीची सासू आता नवा कट रचताना दिसणार आहे. 


सुमनच्या येण्याने वल्लरी आणि मनोजच्या आयुष्यात येणार का नवं वादळ, या दोघांमध्ये सुमन दुरावा आणु शकेल का ? तिच्या येण्याने वल्लरीच्या शिक्षणात सासू अडथळा निर्माण करू शकेल का ? कि मनोज आणि वल्लरीचे नाते त्या वादळाला देखील सामोरं जातील. हे नक्की पिंगा गं पोरी पिंगा मालिकेच्या येत्या भागांमध्ये.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.