*लीला ला पाहून एजे झाला अस्वस्थ !*
*एजेच्या मनातील गुत्थी सुटेल का?*
*'नवरी नवरी मिळे हिटलरला'* मालिकेत लीला आणि एजेच नातं एका वेगळ्या वळणावर आहे. लीला घरी कबूल करते की तिला स्वयंपाक येत नाही, त्यामुळे एजे तिला खीर बनवायला शिकवतो. लीलाच्या सासरच्या घरी आलेल्या तिच्या कुटुंबीयांचा दुर्गा अपमान करते. लीला ती खीर अंतराच्या फोटोसमोर ठेवते, ज्यामुळे एजे नाराज होतो. लीला एजेला समजावून सांगते, "अंतरा माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, खीर तिच्यासमोर ठेवणं योग्य वाटतं." एजे तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करतो. इकडे लीला माहेरी गेली असताना कालिंदी तिला एका गुप्त खोलीत घेऊन जाते, तर एजे लीलाच्या माहेरी आलाय. तिथे त्याला त्याला गुप्त खोलीबद्दल कळतं. दुसरीकडे, लीला एजे ला समोर बघून आनंदी आणि समाधानी आहे. एजे विचारात आहे "लीलाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती गोष्टी लपलेल्या आहेत," ज्यामुळे तो अधिक अस्वस्थ झालाय. एजे, अंतराच्या फोटोसमोर उभा राहून "मला लोकांना समजण्यात कधीच अपयश आलं नाही, पण लीलाच्या बाबतीत काहीतरी चुकतंय." सकाळी आजी रेवतीसाठी लीलाला बांगड्या देते, ज्यामुळे लीला आनंदित होते. पण एजेला त्या बांगड्या बघून आठवतं की त्याने त्या अंतरासाठी घेतल्या होत्या. लीला एजेसाठी कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, तिकडे दुर्गा तिला म्हणते, "एजेच प्रेम तुला कधीच मिळणार नाही. " यावर लीले उत्तर देते, "आज नाही तर उद्या, सगळं बदलणार आहे.
*लीलाचे हे शब्द खरे ठरतील? एजेच्या मनात नक्की काय चालू आहे ? जाणून घ्यायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा फक्त आपल्या झी मराठीवर.*