*सानिकासमोर येणार सरकारचं सत्य ! सानिका सरकारच्या गोड नात्याला लागणार दृष्ट…*
*मुंबई, २१ जानेवारी, २०२५* : कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत सानिका आणि सरकारच्या आयुष्यातील संकटं काही संपण्याचे नाव घेत नाहीये. पहिले पंकजा आणि सर्वेशच्या कुरघोड्या आणि कट आणि आता त्यात सईची भर पडली आहे. सरकार - सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी सई एक संधी देखील सोडत नाहीये. सरकारच्या वाढदिवसापासून सईसमोर सरकार - सानिकाच्या प्रेमाचे सत्य आले आहे. पण, सानिका अजून सरकारच्या एका सत्यापासून अनभिज्ञ आहे आणि ते म्हणजे राजा म्हणजेच साखरगावच्या अप्पासाहेबांचा मुलगा सरकार आहे. सई आता याचाच फायदा घेऊन दोघांमध्ये फूट पाहताना दिसणार आहे. सानिका सरकारच्या गोड नात्याला लागणार आहे सईची दृष्ट. आता सईमुळेच सानिकासमोर येणार सरकारचं सत्य. येत्या भागांमध्ये सरकारचे सत्य समोर आल्यावर राजा म्हणजेच सरकारला सानिका जाब विचारताना दिसणार आहे. पंकजा, सर्वेश आणि सई यांच्या कपटी कारस्थानांमुळे सरकार - सानिकामध्ये अखेर दुरावा येणार आहे. सरकार सानिका आणि कळशी गाव सोडून जाणार ? पुढे नक्की काय घडणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा पहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !
मकर संक्रांतीच्या दिवशी सरकारने सानिकाला लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याच्याबद्दलचे सगळे सत्य त्याने सांगितले. पण ती चिठ्ठी पंकजाने बदलली, हे अजूनही सानिकाला माहिती नाहीये. तसेच सई खेळत असलेली खेळी देखील अजून सरकारने सानिकाला सांगितली नाही. सानिकावर हल्ला करणाऱ्या सईला राजा समजावतो की तू जे काही करते आहेस त्याला प्रेम नाही स्वार्थ म्हणतात. पंकजा सर्वेशला सरकारची चिठी दाखवून म्हणते राजा कळशीचा आहे. नेमकं हे सई चोरून ऐकते. सानिकाला सई कडून चिट्ठी मिळते त्या चिट्ठीत सरकार आप्पा बरोबर फोटो आहे आणि त्यात राजा कळशीचा सरकार आहे आणि आप्पा धुमळांचा मुलगा आहे असं कळतं. सानिका चिडून राजाला जाब विचारायला जाते, सरकार समजावण्याचा प्रयत्न करतोय की त्याने सगळं खरं आधीच मकर संक्रांतीला सांगितलं आहे. पण सानिका मात्र त्याचं काहीचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये.
आता पुढे काय होणार ? आपण खरं बोलत आहे हे सरकार सानिकाला पटवून देऊ शकेल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !
*पहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !*