Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त;

 *नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांचा ‘असंभव’ येत्या १ मे २०२५ रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस*



 *सचित पाटिल आणि मुक्ता बर्वे यांचा आगामी चित्रपट ‘असंभव’ १ मे २०२५ ला होणार प्रदर्शित; नैनीतालमध्ये पार पडला 'असंभव' या चित्रपटाचा मुहूर्त*


मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य,  सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.


वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.  तसच निर्माते शर्मिष्ठा राऊत  आणि तेजस देसाई यांचा  

'नाच गं घुमा' हा सिनेमा महाराष्ट्रभर  गाजला होता त्यामूळे या आगामी सिनेमाकडून देखिल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत



हाय काय नाय का, ,उबुंटू या सिनेमानंतर आता दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री 'असंभव' या सिनेमाचं देखिल दिग्दर्शन करत आहेत.


 इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.