*सुरू होत आहे श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा!*
पहा १९ जानेवारीचा विशेष भाग रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!
कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी मालिका दिवसेंदवस अधिकाधिक रोमांचक होत आहे. तुळजा भवानी आईचे चमत्कार आणि मालिकेतील घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून झाला आणि गावकऱ्यांना त्या बलाढ्य असूरा पासून मुक्तता मिळाली. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव प्रकट झाले. आता महादेवांनी रांगडे भवानी शंकर रूप का घेतले हे हळूहळू उलघडेल. पण आता मालिकेत सुरू होणार आहे श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा.
आई तुळजाभवानी या मालिकेत महाराष्ट्राच्या पावनभूमीत मांजरा नदीकाठी असलेल्या एका गावात सध्या तुळजाभवानीचा मुक्काम असून भक्तरक्षणाचा दैवी अध्याय तिथे उलगडतो आहे. कद्दरासुराच्या अंतानंतर देवी आता या गावातून तिचा कायमचा वास असेल अश्या अढळ स्थानाच्या दिशेने प्रस्थान करण्याचे ठरवते. यासाठी ती काळ-भैरवाला बोलावणं धाडते. तिकडे महादेवही काळभैरवाला मार्गदर्शन करतात. देवीचे हे अढळस्थान शोधण्याची ही दैवी लीला, महादेवांचीच तर नाही ना ?, या कामासाठी काळभैरवाचीच नियुक्ती का? आज तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाची उत्पती कशी झाली. याची रंजक कथा आई तुळजाभवानीच्या आगामी भागात उलगडणार आहे, काळभैरवाचा हा कथाभाग येत्या रविवारी १९ जानेवारीला रात्री ९ वाजता आई तुळजाभवानीच्या विशेष भागात सादर होईल.
तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !