Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

 २०२५ ची मराठमोळी सुरवात, सोनू निगमच्या सुमधुर आवाजातलं पहिलं गाणं ‘चंद्रिका’ प्रेक्षकांच्या भेटीला !! 


सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’


सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे.

अनेक भाषांमधून सोनू निगमने पार्श्वगायन केलं आहे. ते सर्वात लाडक्या गायकांपैकी एक आहेत ह्यात काहीच शंका नाही. आता पर्यंत त्यांनी भरपूर गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पण यंदा नवीन वर्षाची सुरुवात सोनू निगमने एका मराठमोळ्या गाण्याने केली आहे. होय सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं, आगामी मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान‘ यातलं गाणं ‘चंद्रिका’ सोनू निगम ह्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गायलं आहे जे आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. 


गायक सोनू निगमने पहिल्यांदाच अशा प्रकारचं गाणं एका मराठी सिनेमासाठी गायलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. "चंद्रिका" या गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाले 'असं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल, हे गाणं खूपच वेगळं आहे, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एका मंदिराचे वातावरण तयार झाले, परंतु हे एक डिव्होशनला सोंग नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमा मध्ये सुद्धा भक्ती आहे, मी ह्या गाण्यासाठी कुठला हि स्वार्थ ना करता स्वतःला पूर्णपणे समर्पण केलं आहे. देवाचे आभार आहेत कि मला अशा प्रकारचं गाणं गायला मिळाला. '


जितकं सुरेख हे गाणं ऐकायला आहे तितकच सुरेख चित्रीकरण या गाण्याचं झालंय. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघा कलाकारांवर हे गाणं चित्रीत केलं गेलय आणि त्यात सोनू निगमच्या आवाजाची जादू तर जणू काही स्वर्ग. 



सोनू निगम ह्यांनी नाट्य संगीत बद्दल माहिती देताना सांगितलं 'मी संगीताच्या शैलीशी संबंधित आहे, म्हणूनच मी जगात शक्य तितके संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो, मला माझ्या लहानपणी शास्त्रीय संगीत शिकता आले नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं शिकून मी प्रेक्षकांसाठी गातो. मी भारतातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत, लोकांचा विश्वास आहे की मी गाऊ शकतो, त्यामुळे मला प्रत्येक भाषा समजून घेण्याची संधी मिळाली. स्वर्गीय लता मंगेशकर जी आणि आशा जी हे महान गीतकार आहेत तर अजय-अतुल हे सुद्धा उत्तम संगीतकार आहेत, त्या सर्वांना नाट्यसंगीताची खूप खोलवर माहित आहे. त्यामुळे त्यांच्याकाढून शिकण्यासारखं खूप काही आहे.' 


इतकच नव्हे तर मराठी संगीत आणि मराठी गायक या विषयी सुद्धा सोनू निगम ह्यांनी आपला मत मांडत त्यांचा आवडता मराठी गायक कोण ह्याची माहिती दिली ते म्हणाले "मराठी गाण्यांमध्ये खूप शोध आहे, जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच पण त्याबरोबर मराठी लेखन हे ही एक वेगळं विश्व आहे. मराठी गायकांबद्दल सांगितलं तर बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो, तिने चंद्रमुखी मध्ये खूप सुरेख गायलं आहे. इतर सुद्धा अनेक मराठी गायक आहेत ज्यांचा आवाज मला खूप आवडतो.'


या वेळी बोलताना सोनू निगम ह्यांनी "संगीत मानापमान" या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांची तारीफ केली आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. जिओ स्टुडिओज ह्यांचे सुद्धा सोनू निगम ह्यांनी आभार मानत सांगितलं कि "जिओ स्टुडिओज मराठी नेहमीच काहीतरी नवीन कन्टेन्ट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात असतं जे खरोखरच प्रशंसनीय आहे. 


सुंदर आवाज, सुंदर कंपोझिशन, सुंदर चित्रीकरण असल्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून ह्या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सूबोध भावे आणि वैदेही परशुरामी सोबत सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.