सावलीची लढाई आणि सारंगचा संघर्ष
सावली सारंगच्या आयुष्याचा श्वास बनली आहे, जग्गनाथचा, तिलोत्तमाला इशारा !
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंगच्या आयुष्यात जे वादळ आले आहे ते शांत करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे. सारंग जगन्नाथला समोर पाहताच जमिनीवर नतमस्तक होऊन विचारतो, "अस्मी खरी होती की खोटी?" जगन्नाथ म्हणतो , "अस्मी खोटी आहे." हे ऐकून सारंग पूर्णपणे खचतो, त्याच्या जगण्याचा आधार गमावल्यासारखा उद्ध्वस्त होतो. जगन्नाथ तिलोत्तमा बद्दल सारंगला सांगण्याच्या प्रयत्नात असताना, सावली ठामपणे पुढे येऊन सांगते, "मेहंदळे कुटुंबाविरोधात काहीही बोलू नका, कारण तुमची दुसरी मुलगी सावली आता या कुटुंबाचा एक भाग आहे." यावर जगन्नाथ तिलोत्तमाला सांगतो, "मी हजार वेळा खोटं बोललो असेन, पण एक गोष्ट खरी आहे—सावली सारंगच्या आयुष्यात श्वास बनली आहे. तिला बाहेर फेकण्याआधी तुम्हाला हजारदा विचार करावा लागेल.
" इकडे एकनाथ म्हणजेच बाबांसमोर समोर सावली आनंदी असल्याचं भासवत सारंगबरोबरचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतेय. सावली सारंगच्या खोलीबाहेर उभी राहून आत जायचं की नाही यावर विचार करत असताना सारंग अचानक दार उघडतो. सावली त्याला सगळी परिस्थिती सांगते. सारंगच्या पाठिंब्याने सावलीचा चेहरा आनंदाने उजळणार आहे. दरम्यान, भैरवी सावलीला आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणण्याचा डाव आखतेय. जगन्नाथच्या फोनमधलं फुटेज मिळवण्यासाठी ती सावलीला प्यादं बनवण्याचा प्रयत्न करते. सारंग अस्मीच्या घराची चौकशी सुरू करतो, याचवेळी ऐश्वर्या पुढे येऊन सारंगला अस्मीचे मेसेज दाखवते आणि दावा करते की अस्मी खरंच त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छित होती. हे ऐकून सारंगच्या भावना आणखी गोंधळात टाकल्याजातात. इकडे सावली सारंगच मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय. .
सारंगच्या वेदना कमी करण्यासाठी सावली काय निर्णय घेईल ? ऐश्वर्या, अस्मीला परत सारंगच्या आयुष्यात आण्यासाठी यशस्वी होईल ? यासाठी बघायला विसरू नका "सावळ्याची जणू सावली" दररोज संध्या ७:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.