Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाखात एक आमचा दादा'मध्ये तुळजा, सूर्या आणि तेजूचा संघर्ष

 लाखात एक आमचा दादा'मध्ये  तुळजा, सूर्या आणि तेजूचा संघर्ष



नात्यांमधील गुंतागुंत, संघर्ष, आणि तडजोडींची अनोखी कथा सध्या लाखात एक आमचा दादा या मालिकेत उलगडते आहे. जेव्हा तुळजा, सूर्या आणि तेजूच्या  आयुष्याचा तिढा एका वळणावर येतो. प्रेम, निष्ठा, आणि संघर्षांनी भरलेली ही गोष्ट प्रत्येक वळणावर रोमांचक होत जातेय. नुकतंच आपण पाहिलं की तेजूचं शत्रूसोबत लग्न झालय. सूर्या स्वतः पालखी उचलून तिला सासरी सोडतो. संसार सुरू होताच तेजू जालिंदरचा दबाव आणि शत्रूच्या त्रासाला सामोरी जाते. लग्नानंतरचे पारंपरिक विधी सुरू असतानाच तुळजाला कळतं की तेजूसाठी आलेले पैसे जालिंदरने लपवले आहेत. यामुळे तणाव वाढतो.



 दुसरीकडे, सूर्या तेजूसाठी भेटवस्तू आणण्याचा प्रयत्न करतोय. सत्यनारायण पूजेदरम्यान शत्रू तेजूला गरम शिरा खायला देतो, ज्यामुळे तिचं तोंड भाजतं. या सगळ्यात सूर्या तिच्यासाठी आधार ठरतो. तर दुसरीकडे तुळजा आणि जालिंदर यांच्यात संपत्तीच्या कागदांवरून वाद उभा राहतो. सूर्या तुळजासाठी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतो, मात्र जागेवरून सुरू झालेला संघर्ष त्यांना घरातच क्लिनिक उघडण्यास भाग पाडतो. दरम्यान, तेजू शाळेत शिकवत असताना शत्रू तिला उद्यापासून शाळेत न जाण्याचा आदेश देणार आहे. सूर्या तुळजासाठी क्लिनिक सुरू करतोय, पण इकडे तेजूच्या स्वातंत्र्याचे सगळे दरवाजे बंद झालेत. 



काय असेल ह्या संघर्षाचा पुढचा भाग ? जाणून घ्या लाखात एक आमचा दादा दररोज रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.