Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'लक्ष्मी निवास' आनंदयात्रा - स्वप्नांची सफर

 'लक्ष्मी निवास' आनंदयात्रा - स्वप्नांची सफर



झी मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी नेहेमीच सज्ज असते. म्हणूनच 'लक्ष्मी निवास' या स्वप्नं आणि भावना यांनी भरलेल्या मालिकेच्या भव्य लाँचच्या निमित्ताने मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज उद्यान’ (शिवाजी पार्क) येथे एक भव्य, अप्रतिम आणि अनोखी स्कूटर रॅली आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासोबत ४० मध्यमवयीन जोडपी सहभागी झाली होती. जी स्वप्न आयुष्याच्या या टप्प्यावर पूर्ण व्हायची राहून गेली होती होती किंवा जी स्वप्न पूर्ण झाली होती त्यांना उजाळा देत या जोडप्यांनी आपल्या आठवणी शेअर करत ह्या रॅलीत आणि पत्रकारपरिषदेत चारचाँद लावले. 




या पत्रकार परिषदेसाठी  मालिकेचे इतर मुख्य कलाकार सुद्धा उपस्थित होते. यासोबतच, झी मराठीने माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांच्या त्याच्या पालकांसोबत या अविस्मरणीय सोहळ्याचा भाग बनवण्याची संधी दिली. जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्वप्न आणि आठवणींना उजाळा देत मालिकेच्या कलाकारांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधींनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या अनोख्या कल्पनेला मनापासून दाद दिली.



'लक्ष्मी निवास' ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. ३ मुलं, ३ मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते आहेत क्रिएटिव्ह माईंड सुनील भोसले.



या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच दररोज १ तासाचा भाग प्रक्षेपित होणार आहे. दररोज मालिकेचा १ तासाचा भाग प्रक्षेपित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेव्हा पाहायला विसरू नका अनेक आव्हानांचा सामना करत कुटुंबाची मोट बांधुन ठेवणाऱ्या जोडप्याची गोष्ट, प्रत्येक मध्यमवर्गीयाला आपलीशी वाटेल अशी खरी गोष्ट! 'लक्ष्मी निवास' २३ डिसेंबरपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.