Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवीन संकटांचा सामना करण्यासाठी शिवा सज्ज!

 नवीन संकटांचा सामना करण्यासाठी शिवा सज्ज!



कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा एक नवी सुरुवात करत शिवा, घर सोडून साध्या गॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेते. या नाट्यमय वळणावर, शिवा तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटाना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवते. तणाव वाढत असताना, आशू, शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचे गुपित उघड करू नये म्हणून भावनिक ब्लॅकमेल करते. शिवा आशूला पाठींबा देत राहते, पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. दुसरीकडे, कीर्ती आणि सुहास शिवा आणि आशूमध्ये दुरावा निर्माण करण्याचा कट रचतात आणि नेहाला आदर्श सून म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. शिवा तिच्या वाढदिवसादिवशी आशूसोबत दिव्याच्या भेटीबद्दल प्रश्न विचारते, पण दिव्या चंदनच्या मदतीने खोटं सांगते.  घरात आशूच्या आजारपणामुळे आणि नेहाच्या येण्याने वाद निर्माण होतात.




 आशु आणि नेहा कामावर जात असताना त्यांच्यावर गुंडांचा हल्ला होतो, ज्यामध्ये पाक्याचा सहभाग असल्याचं उघड होत. शिवा प्रसंगावधान राखून नेहा व आशूचा जीव वाचवणार आहे. तिच्या या शौर्याने ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात घर करणार आहे. हे होत ना होत त्यातच कीर्ती शिवावर फसवणुकीचा आरोप करत धक्कादायक पुरावे सादर करते, ज्यामुळे आशूचा शिवावरचा विश्वास डळमळीत होतो. आशूच्या दबावामुळे शिवा घर सोडते आणि गॅरेजमध्ये निवारा घेते. तिथे कैलास तिला तिच्या प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला आणि जीवनाच्या नव्या लढाईसाठी तयार होण्याचं धैर्य देतो. 


तेव्हा पाहायला विसरू नका 'शिवा' दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.