Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अप्पूमा आणि मास्टरच्या निमंत्रण घेऊन अमोल पोहोचला कुरुंदवाडला !

*अप्पूमा आणि मास्टरच्या निमंत्रण घेऊन अमोल पोहोचला कुरुंदवाडला !*

*सिम्बाला भेटायला चिमुकल्यांपासून आजींची गर्दी*

*अमोलची शेवटची इच्छा अर्जुन- अप्पीचे लग्न कसं पार पडणार !*




*"अप्पी आमची कलेक्टर"* मालिकेत अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहे. अमोल, रुपाली आणि स्वप्निलला एक लहान मूल दत्तक घेण्यासाठी सांगतो. अप्पी आणि अर्जुनदेखील अमोलच्या या सूचनेला पाठिंबा देतात. सगळ्यांच्या समस्या सोडवल्यानंतर, अमोल शेवटी त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवणार आहे. जी ऐकून अप्पी -अर्जुन थक्क होतात. अमोल सर्वांसमोर आपली खरी इच्छा, अप्पी आणि अर्जुनच लग्न असल्याचं सांगतो. अमोलची ही गोष्ट ऐकून दोघंही नकार देतात, पण बापू आणि विनायक अमोलच्या बाजूने उभे आहेत. अप्पी-अर्जुन विचार करत असतानाच अमोलची तब्बेत अजून खराब होते. डॉक्टर त्याची तपासणी करून अमोलकडे फारसा वेळ उरलेला नसल्याचं सांगतात. आता फक्त एक शस्त्रक्रिया त्याला ५ टक्के  जगण्याची संधी देऊ शकते. हे ऐकून अप्पी आणि अर्जुन लग्न करण्यास तयार होतात. आता ही गोष्ट संकल्पच्या कानावर पडणार आहे. अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा सोहळ्याची तयारी सुरु आहे. 



*आपल्या अप्पी माँ आणि मास्टरच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन अमोल पोहचला कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडला या गावात.* अमोल-अप्पी तिथे पोहचताच सर्वांचा उत्साह शिगेला पोहचला. लहान मुलं त्याच्यासोबत खेळायला  तर  आजी- आजोबा  अमोलचे लाड करायला त्याला आशिर्वाद द्यायला पोहोचले. अमोलच्या आग्रहनुसार हा विवाह सर्व पारंपरिक विधींसह दणक्यात पार पडणार. पण अमोलची एक अट आहे, की लग्न शस्त्रक्रियेनंतर नाही तर त्याआधीच व्हायला हवं.


*काय होईल अप्पी-अर्जुनच्या लग्नात?  अमोलच्या आयुष्यातले  शेवटचे क्षण अप्पी-अर्जुन कसे सुंदर बनवतील. बघायला विसरू नका "अप्पी आमची कलेक्टर" सोम-शनि संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.