Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*संपूर्ण महाराष्ट्राला लागणार सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याचं वेड*

 *'सन मराठी' वरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ*

*संपूर्ण महाराष्ट्राला लागणार सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याचं वेड*


'सन  मराठी' वाहिनीवरील नंबर वन मालिका म्हणजेच 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सत्याला मंजूबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर मालिका एका रंजक वळणावर आली आहे. याचनिमित्ताने *पहिल्यांदाच* 'सन मराठी' वाहिनी लाडक्या प्रेक्षकांसाठी सत्या-मंजूच खास रोमँटिक गाणं भेटीला घेऊन येणार आहे. येत्या सोमवारी  म्हणजेच २३  डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता  हा भाग 'सन मराठी' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेलं पाहायला मिळतंय. या प्रोमोमध्ये सत्या व मंजूच्या नव्या लूकने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. सातारा शहरात हे गाणं शूट करण्यात आलं. 



*मंजू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की,* "संपूर्ण महाराष्ट्रात सत्या-मंजूची जोडी हिट ठरतेय या गोष्टीचा खूप आनंद आहे. 'सन मराठी' वाहिनीवर  एका मालिकेसाठी गाणं शूट करण्यात येतंय आणि ती मालिका आमची आहे. ही गोष्ट आमच्या टीमसाठी अभिमानास्पद आहे. मंजू नेहमीच प्रेक्षकांना पोलिसांच्या लूक मध्ये पाहायला मिळाली पण या रोमॅंटिक गाण्यात मंजूचा मॉर्डन लूक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जेव्हापासून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रोमो पाहिलाय तेव्हापासून मला खूप मेसेज येत आहेत. प्रेक्षकांचे हे मेसेज पाहून मला काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. आता हे गाणं हिट होणार एवढं नक्की."


*सत्या ही भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदम म्हणाला की,* "आमची मालिका नंबर वन आहे या गोष्टीचा आनंद तर आहेच पण 'सन मराठी' वाहिनीवर ओरिजिनल गाणं शूट होतंय त्यात आम्हाला संधी मिळाली. यासाठी खरंच 'सन मराठी'चे खूप आभारी आहोत. सातारा मधील प्रेक्षकांनी सत्याला खूप आपलंस केलं आहे. सत्या-मंजूला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड वाट पाहिली. आता खऱ्या अर्थाने सत्याला मंजूचं वेड लागलंय. प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सत्या- मंजूचं हे रोमँटिक गाणं तयार आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.