पार्टीस्मार्ट आणि आदित्य रॉय कपूर देत आहेत स्मार्ट पद्धतीने सेलिब्रेट करण्याची स्फूर्ती
मुंबई, ९ डिसेंबर २०२४: मुंबईत पार पडलेल्या एका शानदार कार्यक्रमात बॉलिवूड हार्टथ्रॉब आणि पार्टीस्मार्टचा ब्रँड अॅम्बेसेडर आदित्य रॉय कपूरने पार्टीस्मार्ट गम्मीजचे अनावरण केले. आपली सर्वपरिचित खूण असलेल्या जादूई व्यक्तिमत्वाची भुरळ पाडत आदित्यने पार्टी करण्याचा एक स्मार्ट उपाय सादर केला, जो ग्राहकांना उत्सवाचा आनंद सुरक्षित, नैसर्गिक आणि सोयीस्कर पद्धतीने व जबाबदारीने आणि पार्टीनंतरच्या नकोशा आफ्टरइफेक्ट्सविना घेता यावा यासाठीच तयार करण्यात आला आहे. प्रयोगांतून सुरक्षितपणा सिद्ध झालेल्या, घातक दुष्परिणाम नसलेल्या आणि आगळ्यावेगळ्या गमी स्वरूपात येणारे पार्टीस्मार्ट यंदाच्या उत्सवी मोसमाचा आनंद लुटण्याचा नवा दृष्टिकोन लोकांना देण्यासाठी सज्ज आहे.
पार्टी गुरु म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि अलीकडे पार्टीस्मार्टचा चेहरा घोषित झालेल्या आदित्य रॉय कपूरने या नव्या उत्पादनाविषयी आपला उत्साह व्यक्त केला, “पार्टीस्मार्टच्या या जबरदस्त इव्हेन्टमध्ये सहभागी व्हायला मी प्रचंड उत्सुक आहे, जिथे आम्ही सगळेच आपल्या आयुष्यातले काही सर्वोत्तम अनुभवताना आपली पार्टी स्मार्ट पद्धतीने साजरी व्हायला हवी या मताचे आहे. पार्टीस्मार्ट म्हणजे नकोशा वाटणाऱ्या आफ्टरइफेक्ट्सची चिंता न करता सोश्यल इव्हेन्ट्समध्ये आपला वेळ आऩंदात घालवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठीच गेम-चेंजर आहे. ते परिणामकारक तर आहेच, पण त्याचबरोबर आपला आनंद जबाबदारीने साजरा करण्याची खबरदारी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.संतुलित जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या आणि लोकांना आपली बहुतांश सेलिब्रेशन्स आपल्या स्वास्थ्याशी तडजोड न करता पार पाडण्यास प्रोत्साहन देणाऱ्या एका ब्रॅण्डचा चेहरा बनणे हा माझ्यासाठी एक थरारक अनुभव आहे.”
हिमालया वेलनेसचे बिझनेस डायरेक्टर राजेश कृष्णमूर्ती यांनी उल्लेख केला, “एक कंपनी म्हणून आम्ही नेहमीच निसर्गाची विज्ञानाशी सांगड घालणारी उत्पादने पुरविण्याशी, व हे करताना आपल्या ग्राहकांच्या स्वास्थ्य आणि देखभालीची काळजी घेण्याशी कटिबद्ध राहिलो आहोत. पार्टीस्मार्टमध्ये आमच्या हे तत्व अचूकपणे प्रतिबिंबित झाले आहे, हे उत्पादन सुरक्षित असल्याचे प्रयोगांतून सिद्ध झाले आहे, लिव्हरचे स्वास्थ्य जपण्यास मदत करणारे आहे, लोकांना आपल्या स्वास्थ्याशी तडजोड न करता जबाबदारीने सोहळे साजरे करण्यास सक्षम बनविणारे आहे. हँगओव्हर रोखण्याच्या उपाययोजनांमधील सुरक्षिततेचे महत्त्व आम्हाला माहीत आहे, आणि म्हणूनच आमची उत्पादने नैसर्गिक घटकांचा वापर करून अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली आहेत, कठीण चाचण्यांतून पार झाली आहेत जेणेकरून ती शरीरासाठी सौम्य असावीत व घातक दुष्परिणामांपासून मुक्त असावीत