Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरयांनी राएल पदमसींच्या 'राईज अप फॉर इक्वॅलिटी' महोत्सवाची शोभा वाढवली*

 *मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर राएल पदमसींच्या 'राईज अप फॉर इक्वॅलिटी' महोत्सवाची शोभा वाढवली*



दिग्गज रंगकर्मी राएल पदमसींच्या क्रिएट फाउंडेशनने अभिनेत्री लुशीन दुबे यांच्या सहकाऱ्याने ‘राईझ अप फॉर इक्वलिटी’ हा महोत्सव सोफीया भाभा ऑडिटोरियम, ब्रीच कँडी येथे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित केला होता. 2०२३ च्या यशानंतर यावर्षीही महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी सशक्त कथेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्याचा पयत्न म्हणून सुरु झालेल्या या महोत्सवात सादर केल्या गेलेल्या अनेक नाट्यकृती  महिलांच्या संघर्ष, न्याय, आणि प्रगल्भतेच्या कथांचा वेध घेणाऱ्या होत्या.



सोफीया भाभा ऑडिटोरियम आयोजित या उत्सवाच्या पहिल्या दिवशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मागील वर्षीप्रमाणेच आपला ठाम पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत झोन 2 डीसीपी मोहित गर्ग, एसीपी सुमन चव्हाण, डॉ. मेघा फनसाळकर, आणि महिलांच्या निर्भया स्क्वॉड उपस्थिती होती. या सर्वांनी एकत्र येऊन या महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्याची गरज अधोरेखित केली.


पहिल्या दिवशी, लुषिन दुबे यांनी ‘अनटायटल्ड’ हे विजय दान डेठा यांच्या ‘न्यारी न्यारी मर्यादा’ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॅरियो फो मेडिया यांच्या 'मेडिया' वर आधारित सोलो नाट्य सादर केले. पितृसत्तात्मक नियमांविरुद्ध विद्रोहाचे प्रतीक असणाऱ्या या नाटकाचे कथानक  एका  पारंपरिक मर्यादा झुगारून आपली ओळख प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानी राणीच्या धैर्यशील प्रवासाची कहाणी मांडते.



मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले, “हा एक अतिशय उत्तम आयोजित केलेला आणि प्रभावी महोत्सव आहे. लुशिन दुबे यांचा एकपात्री नाटक खूप प्रेरणादायक आहे; त्यामध्ये समाजासाठी एक ताकदीचा संदेश आहे, आणि मला आशा आहे की हा संदेश लांबपर्यंत पोहोचेल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस सतत कार्यरत आहेत आणि यासाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे १०३ जनजागृती कार्यक्रम. या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल मी राएल पदमसी, ऐस प्रॉडक्शन्स आणि क्रिएट फाऊंडेशनचा आभारी आहे. त्यांनी खूप मदत केली असून सोनाली बेंद्रे आणि जूही चावला यांसारख्या सेलिब्रिटींनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. मी त्यांचे आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो, कारण हा संदेश प्रत्येक महिलेला, विशेषतः ज्या वंचित आहेत किंवा ज्यांना त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात, घरात किंवा कामाच्या ठिकाणी आधार मिळत नाही, अशा सर्वांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक मदतीसाठी तयार आहोत आणि शहरातील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित असल्याची खात्री देण्यासाठी कार्यरत आहोत.”  



राएल पदमसी महोत्सवाच्या उद्दीष्टाबद्दल बोलताना म्हणतात, 'राईझ अप फॉर इक्वलिटी' महोत्सव आम्ही महत्त्वपूर्ण संवाद सुरु करणे, बदल प्रेरित करणे आणि महाराष्ट्राला महिलांसाठी एक सुरक्षित आणि सशक्त राज्य बनवण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन सुरु केला आहे. हा उत्सव फक्त प्रदर्शनांची मालिका नाही; ही कृती करण्याची हाक आहे. खरे सामाजिक आणि वृत्तिपरिवर्तनीय बदल फक्त तेव्हा साध्य होऊ शकतात जेव्हा सामायिक ध्येयाने नागरिक समाज एकत्र येतो. अश्या सामूहिक कृतीमुळेच आम्ही टिकाऊ प्रभाव निर्माण करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समानता, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाची दीर्घकालीन वारसा सोडू शकतो. हे जग आम्हाला आमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी बांधायचे आहे. आम्ही प्रेक्षकांना , मुंबई हे  महिला आणि मुलांसाठी जगातील सर्वात सुरक्षित शहर  बनवण्यात आम्हाला सहकार्य करायला आमंत्रित करतो."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.