जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये विशाल साबळे यांचे , " नायिका "
दर्शन घडवणारा हा प्रेरणेचा खजिना आहे. या सर्व मूर्ती शक्तिशाली देवींमध्ये रूपांतरित होत आहेत, देवत्व आणि ते प्रतिनिधित्व करत असलेली गहन ऊर्जा मी माझ्या प्रत्येक कॅनव्हासवर दाखवण्याचा प्रयत्न केला असून हा समृद्ध वारसा एका विशिष्ट भारतीय रंगातून प्रतिबिंबित केला आहे. माझ्या या चित्रकृती आपल्या संस्कृती आणि वारशाचा जिवंतपणा साजराकरणाऱ्या आहेत असेही विशाल साबळे यांनी यावेळी सांगितले.
एम. एफ. हुसेन यांनीही विशाल साबळे यांचे कौतुक केलेले आहे. एम. एफ. हुसेन यांनी केलेली प्रशंसा आणि प्रोत्साहनामुळे विशाल साबळेंचा कलात्मक प्रवास आकाराला आला आहे. एम. एफ. हुसेन आणि एस.एच. रझा. सांस्कृतिक मंत्रालयाचा यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप पुरस्कार विशाल साबळेंना प्राप्त झाला असून लोकमत मीडियाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय कला प्रदर्शनातही त्यांनी आपली कला सादर केली होती.
'नायिका- रीक्रिएटिंग द एसेन्स ऑफ फेमिनाइन'च्या माध्यमातून, लोकांमध्ये पुराण कथांबाबत कुतूहल जागृत करणे आणि प्राचीन आणि आधुनिक यांच्यातील संबंध वाढवण्याचे विशाल साबळेंचे उद्दिष्ट आहे. हे प्रदर्शन भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लँडस्केपच्या माध्यमातून सादर करण्यात येत असून यातून स्त्री शक्तीची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.
'नायिका' हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान आयोजित केलेले असून कलाप्रेमी आणि सांस्कृतिक जाणकारांनी स्त्रीत्वाचा वारसा सांगणाऱ्या या प्रदर्शना कला प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर भेट द्यावी. असे आवाहन साबळे यांनी केले आहे.