Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'मिशन अयोध्या'चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित!*

*'मिशन अयोध्या'चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित!*

*‘पुष्पा २’ सोबत 'मिशन अयोध्या'ची स्टॅटिक झलक वाढवतेय रसिकांची उत्कंठा!!*

*भक्तिभावाचे सुवर्ण पर्व २३ जानेवारी २०२५ पासून तुमच्या भेटीला!!!*


*मुंबई (चित्रपट प्रतिनिधी):* अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेले हे 'पोस्टर' आज ‘पुष्पा २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासोबत ‘स्टॅटिक झलक’ रूपात प्रदर्शित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच अशा तोलामोलाच्या पोस्टरने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.


‘पुष्पा २’ च्या इंटरवलमध्ये दिसलेली ‘मिशन अयोध्या’ ची १० सेकंदांची स्टॅटिक झलक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारी प्रभू रामांच्या नामाची भक्तिमय धून यांचा परिपूर्ण संगम प्रेक्षकांवर गारूड घालतो.



या अभिनव कॅम्पेनबाबत बोलताना दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले, "पुष्पा -२ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांसमोर प्रेरणादायी झलक मांडण्याचा आमचा उद्देश होता. ‘मिशन अयोध्या'ची अवघ्या १० सेकंदांच्या स्टॅटिक पोस्टरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा चित्रपटाच्या यशाची नांदी आहे. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या चर्चांमुळे ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारीपासून बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवेल."


या पोस्टरमध्ये संघर्ष, भक्तिभाव, आणि प्रेरणा यांचा अभूतपूर्व मिलाफ दिसतो. आगीच्या विळख्यात झेंड्याला घट्ट पकडून उभा असलेला व्यक्तीचा संघर्ष रामभक्तांच्या सशक्ततेचे प्रतीक आहे. यातून ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक चित्रपट नसून, भक्तिभावाचा सुवर्ण पर्व आहे, हे स्पष्ट होते, असे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांनी म्हटले आहे.


‘मिशन अयोध्या’ हा अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या स्थापनेनंतर चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. च्या बॅनरखाली निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्या लेखन - दिग्दर्शनातून हा चित्रपट उभा राहिला आहे.


राममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. भक्तिभाव, राष्ट्रभक्ती, आणि मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणार आहे.


*मिशन अयोध्याबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी :* https://www.instagram.com/rkyoginiproductions

https://www.facebook.com/profile.php?id=61570279283901



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.