'पारू' मध्ये माझी निवड एकदम झटपट झाली- श्वेता खरात
'मला सरोज खान म्हणाल्या होत्या हे क्षेत्र सोडू नकोस' - श्वेता खरात
'पारू' मालिकेतील अनुष्काची भूमिका गाजवत असेल अभिनेत्री श्वेता खरात हिने संवाद साधताना २०२४ हे वर्ष तिच्यासाठी काय देऊन जात आहे आणि 'पारू' मालिकेतली भूमिकेला तिला कसा प्रतिसाद मिळत आहे या बद्दल सांगितलं. "मी पारू मालिकेत अनुष्काची भूमिका साकारत आहे. ती एक आर्किटेक्ट आहे. ती खूप वर्ष परदेशात राहून आता परत गावात आली आहे. ती एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे जो आहे 'इको स्कूल' चा. तिला पुरस्कार ही मिळाले आहेत. ती अंत्यंत शिस्तबद्द आणि आपल्या कामात चोख असली तरीही ती प्रेमळ आहे. अहिल्यादेवी तिची प्रेरणा आहे. माझी निवड एकदम झटपट झाली या भूमिकेसाठी. मला कॉल आला,आमची भूमिकेबद्दल चर्चा झाली,भूमिका मला खूप आवडली आणि मग लागेचच माझं शूट सुरु झालं. याआधी झी मराठीवरील माझी पहिली मालिका 'मन झाले बाजींद' मध्ये प्रेक्षकांनी मला सोज्वळ, सोशिक, शांत, सहनशील अश्या भूमिकेमध्ये बघितलं आहे.
आता मला काही तरी वेगळ अनुभवायला मिळतंय आणि प्रेक्षकांनाही मला अगदीच वेगळी भूमिका करताना पाहायला मिळतंय. मला खूप मेसेज येत आहेत खरंच अनुष्का तुम्ही आहेत का, खूप छान प्रतिसाद मिळत आहे. तशी मी एक प्रोफेशनल डांसर ही आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीचं 'बॉलीवूड इज लाईफ' हे खूप आवडायचं मला. मी सरोज खान मॅमचा डांस वर्कशॉप केला होता आणि त्यात मला त्यांनी शगुनाचे १०१ रुपये दिले होते आणि मला म्हंटल होते कि हे क्षेत्र सोडू नकोस, तेव्हा मी बॅचलर ऑफ कॉम्पुटर सायन्स शिकत होते. मग मी बरीचशी नाटक केली. त्यानंतर मालिकांसाठी ऑडिशन दिले आणि सिलेक्ट होत गेली. माझ्या आई- बाबांनी खूप साथ दिली आहे आणि म्हणून मी आपलं स्वप्न आज जगतेय. माझा छंद आहे वाइल्ड लाईफ. मी सतत वेगवेगळे नॅशनल पार्क एक्सप्लोर करत असते. मला साईटिंग करायला आवडत, मुळात मला प्राणी आवडतात. सर्वात महत्वाचा छंद म्हणजे डांस ज्याच्यासाठी मी कसा ही करून वेळ काढतेच. २०२४ ची बेस्ट आठवण सांगायची झाली तर मी माझ्या कुटुंबाला घेऊन फिरायला गेले होते. त्यांना वेगळवेगळ फूड ट्राय करायला दिलं, लक्झरी स्टे केलं, आणि खूप मज्जा केली. वेळ नसल्यामुळे माझ्या आई - बाबांना असं कधी अनुभवायला मिळालं नाही. माझ्या आजीने पहिल्यांदा पास्ता, पिज्जा खाल्ला. दुसरी आठवण ही कि माझ्या बाबांना मी चंद्रपूरला घेऊन गेले होते साईटिंग करण्यासाठी, पूर्ण परिवार होता आमचा तिथे. देवकरो मला नेहमी माझ्या आई-बाबांची स्वप्न पूर्ण करता यावी. मला प्रेक्षकांनी आतापर्यंत खूप प्रेम दिलंय. मी जे काम केलंय त्यात त्यांची साथ महत्वाची होती. मी तुमचे प्रत्येक मेसेज वाचत असते आणि मला काम करण्याची अधिक ऊर्जा येते. अनुष्का वर ही तितकंच प्रेम करा. तुम्हा सर्वांचे जितके आभार मानू तितके कमी आहेत."
बघायला विसरू नका अनुष्काच्या एन्ट्रीने पारू- आदित्यच्या नात्याच काय होईल 'पारू' दररोज संध्या ७:३० वा, फक्त आपल्या झी मराठीवर.