Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदित्य चोप्रांची यशराज फिल्म्स घेऊन येत आहे ‘मर्दानी 3’,

*आदित्य चोप्रांची यशराज फिल्म्स घेऊन येत आहे ‘मर्दानी 3’, राणी मुखर्जी म्हणाली, तिसरा भाग ‘डार्क, डेडली आणि ब्रूटल’ असेल!*



यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे। या ब्लॉकबस्टर फ्रेंचाइझीला प्रचंड प्रेम मिळाले असून ती सिने प्रेमींसाठी एक कल्ट स्टेट्स बनली आहे।


आज, ‘मर्दानी 2’ च्या रिलीजच्या वर्धापनदिनी, यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या ‘मर्दानी 3’ ची घोषणा केली, ज्यात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे। राणी मुखर्जी, या भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक, एकमेव अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे सोलो लीड ब्लॉकबस्टर फ्रेंचाइजी चा मान आहे।



राणी मुखर्जी म्हणाली, “मला अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही ‘मर्दानी 3’ ची शूटिंग एप्रिल 2025 मध्ये सुरू करत आहोत! पोलीस युनिफॉर्म घालणे आणि एक असं पात्र साकारणे ज्याने मला नेहमीच प्रेम दिले, ही एक खास गोष्ट आहे। या साहसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पुन्हा न्याय देण्याचा मला अभिमान आहे। ही फिल्म त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे निस्वार्थपणे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज मेहनत घेतात।”


राणीने पुढे सांगितले की, ‘मर्दानी 3’ चे थ्रिल पूर्वीच्या सर्व भागांपेक्षा अधिक असेल।


“जेव्हा आम्ही ‘मर्दानी 3’ बनवण्याचा विचार केला, तेव्हा आमचा उद्देश असा होता की ही फिल्म प्रेक्षकांसाठी आधीपेक्षा वेगळा अनुभव घेऊन येईल। आपल्याकडे असलेल्या कथेने मला खूप आनंद दिला आहे, आणि प्रेक्षकही ती पाहून तितकेच आनंदी होतील अशी आशा आहे।”


राणी पुढे म्हणाली, “‘मर्दानी’ ही खूपच आवडती फ्रेंचाइझी आहे, आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आमचं कर्तव्य आहे। आम्ही ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू। ‘मर्दानी 3’ डार्क, डेडली आणि ब्रूटल आहे। प्रेक्षक या  चित्रपटा ला  किती प्रेम देतील, हे पाहायला मी उत्सुक आहे।


‘मर्दानी 3’ मध्ये यशराज फिल्म्सने लेखन आणि दिग्दर्शन विभागातील दोन नवोदित कलाकारांना फ्रेंचाइझी पुढे नेण्याची संधी दिली आहे।


‘द रेलवे मेन’ फेम आयुष गुप्ता यांनी ‘मर्दानी 3’ चे पटकथा लेखन केले आहे। त्यांच्या प्रखर आणि प्रभावी लेखनशैलीला जागतिक स्तरावर खूप प्रशंसा मिळाली आहे।


फिल्मचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहेत, ज्यांना यशराज फिल्म्सने तयार केले आहे। अभिराज यांनी आधी ‘बँड बाजा बारात’, ‘गुंडे’, ‘सुलतान’, ‘जब तक है जान’, ‘टायगर 3’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे। सध्या ते ‘वॉर 2’ चे सहायक दिग्दर्शक आहेत आणि आता ‘मर्दानी’ फ्रेंचाइझीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.