*'प्रेमास रंग यावे' मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेची धमाकेदार एन्ट्री, झळकणार 'या' भूमिकेत*
'सन मराठी' वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता प्रेक्षकांची मन जिंकून घेण्यासाठी अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे शौर्यच्या आत्याच्या भूमिकेत म्हणजेच मेनका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुंदर व अक्षराच्या आयुष्यात शौर्यमुळे आनंदाचा वातावरण निर्माण झालं होत. पण आता शौर्यच्या आत्याच्या एन्ट्रीने सुंदर व अक्षरा यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळणार आहे. मेनका शौर्यला घेऊन जाणार का? कि सुंदर आणि अक्षराच्या नात्यात अडथळा ठरणार ?
आता मालिकेत नेमक काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'प्रेमास रंग यावे' सोम. ते शनि. रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या 'सन मराठी'वर.