Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*एजेवर आलं संकट, लीला यातून कसा मार्ग काढणार ?*

*एजेवर आलं संकट, लीला यातून कसा मार्ग काढणार ?*

*रेवतीच्या लग्नाची एजे-लीलांनी घेतली जबाबदारी !*



 

जहागीरदारांच्या घरी दिवाळी दणक्यात साजरा झाल्यावर, रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यास आणि ती आनंदात कशी राहील याच  देण्याचं वचन मागते. इकडे श्वेता एजे समोर विष प्यायल्याचं नाटक करते ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही  करून  एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर आहे. ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. ती रुग्णालयात जाऊन श्वेताला भेटते आणि सरोजिनीच्या मदतीने श्वेताशी डील करण्याचा प्रयत्न करते. आता हे डील यशस्वी होईल ? दुसरीकडे वसंतला म्हणजेच रेवतीच्या बाबांना रेवती आणि यशच्या प्रेमाची माहिती मिळते. लीला कलिंदिला वचन देते की, ती यश आणि रेवतीचं लग्न लावून देईल. 

 

*लीला यश आणि रेवतीचं लग्न लावून देण्यात यशस्वी होईल ? श्वेता आणि लीला मध्ये नेमका काय करार झालाय ? जाणून घेण्यासाठी बघत रहा 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.