पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नायजेरियातील मराठी समुदाचे त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप असल्याबद्दल कौतुक केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नायजेरियातील मराठी समुदाचे त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप असल्याबद्दल कौतुक केले आहे
नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
एक्स वर एका पोस्टमधे मोदी यांनी लिहीले आहे.
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल, नायजेरियात, मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेले आहेत, ते पाहणे अतिशय कौतुकास्पद आहे.”